नागेश विद्यालय व महावितरण मधला रस्ता खुला करावा :
मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे नागरिकांची मागणी
जामखेड प्रतिनिधी
शहरातील नागेश विद्यालय व महावितरणच्या मधुन असलेला २२ फुटाचा रस्ता बंद करण्यात आनागेश विद्यालय व महावितरण मधला रस्ता खुला करावा
मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे नागरिकांची मागणी :ला आहे. यामुळे नागरिकांच्या जाण्यायेण्याचा रस्ता बंद झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागत असून शालेय मूलं व रूग्णांना पुढे जाण्यासाठी साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरून जा ये करावी लागत आहे. हा रस्ता लवकर खुला अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी नगरसेवक मोहन पवार, बजरंग डूचे,ताहेर खान, अनिस बागवान,बाळासाहेब डोकडे, शंकर राऊत, विजय कुलकर्णी, सचिन देशमुख,बापूसाहेब कुलकर्णी, धनराज पवार,जमीर बागवान, मनोज इंगळे, मंगेश घोडेस्वार, नितीन यादव,अस्लम भाई शेख,आसिफ शेख, शाहरुख बागवान, अशपाक बागवान,आरिफ बागवान,जाकीर सय्यद,ईश्वर गुड, बबलू बागवान
आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील व महावितरणचे अधिकारी राठोड उपस्थित होते.
याबाबत माहिती की, जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय व महावितरण मध्ये सुमारे २२फुटांचा पायवाट रस्ता आहे. या रस्त्याने चांगल्या प्रकारे वाहतूक होत असून महावितरण ने सदर रस्ता बंद करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार रस्त्याचे खोदकाम चालू आहे या ठिकाणी महावितरण ने सांगितल्या प्रमाणे या ठिकाणी सोलार प्लांट (सौरऊर्जा प्रकल्प)असल्याचे ठेकेदार सांगत आहेत. सदर रस्ता बंद झाल्यास परिसरातील नागरिकांना वागणुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे, तसेच यापैकी परिसरात मोठा रस्ता नाही. याच रस्त्याने जिल्हा परिषद शाळेतील लहान मुले, ल.ना.होशिंग विद्यालय ,श्री नागेश विद्यालय व जामखेड महाविद्यालयातील मुले- मुली याच रस्त्याने ये – जा करत असतात. सरकारी व विविध दवाखान्यात जाणारे रुग्ण व बीड रोडला जाण्या-येण्यासाठी जवळचा मार्ग आहे. याच रस्त्याने रुग्णवाहिका, अग्निशमन गाडी येऊ शकते.
सदर रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे, हा पूर्वत रस्ता खुला करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी दिले आहे. सदर रस्ता पूर्ववत खुला न झाल्यास परिसरातील नागरिकांनी तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215