Homeव्हिडिओ बातम्याजामखेडला सापत्नभावाची वागणूक दोन्ही आमदार गप्प का? नव्या बस त्यांना अन्...

जामखेडला सापत्नभावाची वागणूक दोन्ही आमदार गप्प का? नव्या बस त्यांना अन् त्यांच्या जून्या आम्हाला: आता आंदोलनाची वेळ आली आहे :समस्त जामखेडकर

जामखेडला सापत्नभावाची वागणूक दोन्ही आमदार गप्प का?

नव्या बस त्यांना अन् त्यांच्या जून्या आम्हाला:
आता आंदोलनाची वेळ आली आहे :समस्त जामखेडकर

जामखेड प्रतिनिधी
राज्यपातळीवर राजकीय नेतृत्व असलेल्या जामखेडच्या दोन्ही आमदारांची मात्र आपल्याच जिल्हयात ऐकले जात नाही कींवा एकमेकांच्या राजकीय श्रेयापोटी जामखेडची परवड होत आहे असे दिसून येते आहे.


गेल्या काही दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्याला १३० नव्या बसेस प्राप्त झाल्या आहेत. सर्व बसेस मातब्बर समजले जाणारे लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारयांच्या मतदारसंघातील आगाराला वाटुन दिल्या. आणि जामखेड आगाराला तारकपुर आगाराच्या जून्या बस दिल्या. सभापती आ प्रा.राम शिंदे यांनी नाशिक विभागीय व्यवस्थापकांना जामखेड ला नवीन बस देण्याबाबत कळवले होते. आमदार रोहित पवार यांनीही पत्र दिले होते. मग का बस नवीन आल्या नाहीत. एकाही आमदाराने उघडपणे या प्रकरणी आपलं मत मांडलेले दिसत नाही. जामखेड ग्रामीण प्रवाशी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गुंदेचा यांनी जामखेड आगारातील बसेसची दूरावस्था सविस्तर सांगुन नवीन बसेसची मागणी केली होती. अन्यथा प्रवाशांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आम आदमी पार्टी जामखेड तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा म्हणाले की आता खरी आंदोलनाची वेळ आली आहे. लवकरच एकत्रित येऊन नव्या बसेसाठी तीव्र आंदोलन उभा करणार आहे. प्रवाशी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!