जामखेड तालुक्यात चंदनतस्करी
जवळके येथुन मुद्देमालासह एकास अटक
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात चंदन तस्करी करणाऱ्यांना गिराईक बनावट बनुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धक्का मोठी कारवाई केली आहे. मूद्देमाल जप्त करत आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
दि १०/०२/२०२५ रोजी दुपारी ३.०० वा. जवळके ता. जामखेड या ठिकाणी चंदनाचा चंदनाचा साठा असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने उपवनसंरक्षक अहिल्यानगर धर्मवीर सालविठ्ठल (IFS) यांच्या मार्गशनाखाली सहा. वनसंरक्षक, राहुरी गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन मारूती शेळके, वनपाल प्रविण उबाळे, वनरक्षक शांतीनाथ सपकाळ, रवि राठोड, नागेश तेलंगे, वनमजुर राघु सुरवसे, शिवाजी चिलगर यांनी कारवाई केली
.सदर ठिकाणी घटनेची खात्री करण्यासाठी बनावट गिऱ्हाईक पाठवुन खातर जमा केली असता काका वर्धमान वाळुंजकर हा चंदन तस्करी करत असल्याची खात्री झाली. सदर ठिकाणी आरोपीसह ३५ गोण्या ढलप्या / सालपट, चंदना च्या गाभ्याचा १ तुकडा (वजन १.४ किलो), वाकास – ३, तराजु १, विवो कंपनीचा मोबाईल व बजाज कंपनीची. मोटारसायकल असा मुद्येमाल ताब्यात घेतला आहे.

सदर प्रकरणी राऊंड गुन्हा क्र. ओ ०४ / सन २०२४-२५भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२,५१,५२,६९ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ नियम क्र.३१,५५ अन्वये गुन्हा नोंद केला. आरोपीस ज्युडिशियल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग – १ जामखेड यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ दिवसाची वनकस्टडी दिली आहे.पुढील तपास उपवनसंरक्षक अहिल्यानगर धर्मवीर सालविठ्ठल (IFS) यांच्या मार्गशना खाली सहा. वनसंरक्षक (राहुरी)-गणेश मिसाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी, कर्जत (प्रा.) मोहन मारूती शेळके, वनपाल- प्रविण उबाळे, वनपाल – सुरेश भोसले, वनरक्षक शांतीनाथ सपकाळ, रवि राठोड, नागेश तेलंगे, ववनकर्मचारी करीत आहेत.

चौकट
वनविषयक गुन्ह्याबाबत अथवा वन विषयक गुन्हे घडत असले बाबत काही माहीती असल्यास वनपरिक्षेत्र कार्यालय कर्जत/वनपरिमंडळ कार्यालय जामखेड यांचेशी त्वरीत संपर्क करावा. असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक राहुरी गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके कर्जत जामखेड यांनी केले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
