Homeराजकीयदक्षिणेत तुतारी वाजवणारच :- राणीताई लंके

दक्षिणेत तुतारी वाजवणारच :- राणीताई लंके

दक्षिणेत तुतारी वाजवणारच :- राणीताई लंके

जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत खा सुजय विखे यांना पुन्हा मैदानात उतरवलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण यावर आ निलेश लंके यांच्या निमित्ताने गुढ निर्माण झालं आहे. आ निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र लंके यांनी आपली इच्छा स्वतः अजून पर्यंत स्पष्ट शब्दात व्यक्त केलेली नाही. या पार्श्वभूमीवर जामखेड येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या आ निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना पत्रकारांनी उमेदवारीबाबत विचारले असता राणीताई लंके म्हणाल्या की या बाबत साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही. पण आम्ही पती पत्नी दोघांपैकी एक नक्कीच उमेदवार लंके घराण्यातला असेल, आम्ही अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी तुतारी वाजविणारच असे स्पष्ट सांगितले. आमदार निलेश लंके यांच्यासमोर अजित पवार गटाकडुन पक्षप्रवेशाबाबत तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. कदाचित याच कारणाने आमदार निलेश लंके यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटातील अधिकृत पक्षप्रवेश रेंगाळला आहे. सुरू असलेल्या चर्चेनुसार आमदार निलेश लंके हे राजीनामा न देता स्वतः ऐवजी राणीताई लंके यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या विचारात आहेत. मात्र खासदार सुजय विखे यांच्यासमोर तगडे आव्हान देण्यासाठी निलेश लंके यांनीच निवडणूक लढवावी, अशी शरद पवार गटाने सांगितले असल्याचे बोलले जाते.

त्यामुळे लंके दांपत्यापैकी लोकसभेची उमेदवारी कोण करणार येत्या दोन-तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे आहे. त्यामुळे लंके दांपत्या पैकी एक जण निवडणुकीतच्या रिंगणात नक्कीच असेल असंही राणीताई लंके यांनी सांगितले.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!