Homeव्हिडिओ बातम्याआप कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा ; आप-भाजप कार्यकर्ते भिडले

आप कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा ; आप-भाजप कार्यकर्ते भिडले

आप कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा ;
आप-भाजप कार्यकर्ते भिडले

जामखेड प्रतिनिधी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ दि २२ रोजी आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगर शहरांमध्ये भाजपच्या कार्यालयासमोर जोरदारपणे घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते समोर आल्यामुळे एकमेकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचा प्रकार सुद्धा घडला आहे. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आज राज्यभर, देशभर सुरू झालेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नगर शहरातील लक्ष्मी कारंजा येथील भाजपाच्या कार्यालया समोर आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे निदर्शने करण्यास सुरुवात केली. आपच्या कार्यकर्त्यांनी “केसरी वाघ जिंदाबाद” च्या घोषणा दिल्या तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली व त्यामुळे दोन्ही गटांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे दिसले. दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. याचवेळी कोतवाली पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!