फ्लेक्स बोर्डचं पिक जोमात कमाईतून नगरपरिषद मालामल. वाहनचालकांचे होत आहेत हाल. यु टर्न वरील फ्लेक्स बोर्ड धोकादायक
फ्लेक्स बोर्डचं पिक जोमात
जामखेड शहरात महामार्गावरील लाईटच्या खांबावर मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूंनी फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत.महामार्गावर प्रत्येक यु टर्न वरून इकडून तिकडे जातांना दोन्ही बाजूंच्या वाहनांना फ्लेक्स बोर्डमुळे समोरुन आलेले वाहन दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातात होताहोता वाहनधारक सावरत आहेत.
जर जामखेड शहरात महामार्गावर विविध ठिकाणी लागलेले फ्लेक्स बोर्ड परवानगी घेऊन लागले असतील तर त्या परवानगीपोटी महसूस / कर भरून घेतला असेलच .जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर बोर्ड लागत तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर महसुल /कर जमा होत आहे .परिणामी बोर्ड फ्लेक्स बोर्ड च्या कमाईतून नगरपरिषद मालामाल होत आहे .मात्र वाहन धारकांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत.
सध्या शहरात यात्रा-उत्सव ,विविध कारणांनी स्वागत, शूभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड लावण्याची स्पर्धा दिसत आहे. संबधित प्रशासनाने काही झाल्यानंतर जागे होवु नये. त्याआधीच परवानगीसह इतर बाबींची खबरदारी घेण्याची गरज आहे.
RELATED ARTICLES


शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या फ्लेक्स बोर्डच्या कमाईतून नगरपरिषद मालामाल होत आहे मात्र त्या फ्लेक्स बोर्डमुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत. यु टर्नवरील फ्लेक्स बोर्डमुळे आपघात होण्याची दाट शक्यता आहे .अपघात झाला तर त्या वाहनधारकांना नूकसान भरपाई कोण मदत देणार ? नगरपरिषद की बोर्ड धारक ? खर्डा चौकात बीड रोड काँर्नरवर मोठंमोठे फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत .त्यामध्ये असलेले अनेक फोटो येणारया जाणारयांचे लक्ष वेधून घेत आहेत.
.वाहनधारकांची त्या फोटोवर नजर जात असतांना वाहनावरील ताबा सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही .अशा ठिकाणचे बोर्ड अपघातास कारणीभूत ठरू शकतात .त्यासाठी काही विशेष नियम करण्याची गरज आहे .
मनमानीपणे आपले वर्चस्व दाखविण्यासाठी फ्लेक्स, कमानी उभारतांना दिसत आहेत. संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असतांना दिसत आहे. काही गडबड झाली तरच प्रशासन शांतता कमिटीची बैठक बोलावून शांतता राखण्याचे, आवाहन करण्याचे सोपस्कार पार पाडते. विनापरवाना बोर्डवर कारवाई दुरच संबधितांकडे परवाना सूध्दा प्रशासन विचारत नाहीत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215