सिताराम गडाच्या पायथ्याशी रक्तरंजित थरार सशस्त्र हल्ला करत तरूणाचा खून खर्डा परीसरात खळबळ ; हल्लेखोर फरार
मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तानाजी बोराडे हे सीताराम गडाच्या पायथ्याशी असताना स्कुटीवरून आलेल्या ३ ते ४ जणांच्या टोळक्याने त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच हल्खोरांनी आधी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. बोराडे हे असहाय्य होताच हल्खोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक आणि धारदार वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पाडून हल्खोर घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह डॉ. लाड तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या तानाजी बोराडे यांना जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना, दुर्दैवाने दरडवाडी परिसरात जखमी तरुणाचा मृत्यू झाला .
घटनास्थळी आणि परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती . हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही . खर्डा पोलीस फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास करत आहेत.
RELATED ARTICLES

सदर घटना दि ११ सप्टेंबर रोजी जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील सिताराम गडाच्या पायथ्याशी घडली आहे . भरदिवसा रस्त्यावर घडलेल्या थरारक आणि निघृण हत्येच्या घटनेने खर्डा परीसरात खळबळ उडाली आहे .सीताराम गडाच्या पायथ्याशी अज्ञात टोळक्याने एका ४० वर्षीय तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून भीतीचे सावट पसरले आहे.


प्रतिनिधी यासीन शेख 9423391215