Homeव्हिडिओ बातम्यासमस्त नागरिकांच्या हिताची, सुविधांची काळची आहे ; पंचमी आनंद मेळा बीड रोडवरील...
समस्त नागरिकांच्या हिताची, सुविधांची काळची आहे ; पंचमी आनंद मेळा बीड रोडवरील एमआयडीसी मैदानावर होणार :- प्रांजल चिंतामणी गोंधळात शांतता कमिटीची बैठक संपन्न मुख्याधिकारी गैरहजर ; सत्ताधारी- विरोधकात खडाजंगी जागेचा लिलाव होणार नाही
समस्त नागरिकांच्या हिताची, सुविधांची काळची आहे ; पंचमी आनंद मेळा बीड रोडवरील एमआयडीसी मैदानावर होणार :- प्रांजल चिंतामणी
गोंधळात शांतता कमिटीची बैठक संपन्न
मुख्याधिकारी गैरहजर ; सत्ताधारी- विरोधकात खडाजंगी
जागेचा लिलाव होणार नाही; स्वागतार्ह निर्णय
जामखेड प्रतिनिधी
जामखेडची राज्यात नावलौकिक प्राप्त असलेली श्री नागेश्वर पंचमी उत्सव काळात जामखेड सह या उत्सवात बाहेरगावाहून येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अवश्यक त्या सर्व सुविधा नगरपरिषदेच्या वतीने पुरविल्या जातील तसेच शहरातील बीड रोडवरील प्रशस्त असलेल्या एमआयडीसी च्या मैदानावर पंचमीचा आनंदमेळा भरविण्यात येणार आहे असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले .पंचमी निमित्ताने शांतता कमिटीची बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती .
यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तहसीलदार मच्छिंद्र पाडळे , पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी ,नगराध्यक्ष प्रतिनिधी अमित चिंतामणी ,सभापती शरद कारले ,अजय काशिद ,नगरसेवक श्रीराम डोके ,पवन राळेभात ,अँड प्रविण सानप ,प्रविण चोरडिया ,अर्जुन म्हेत्रे ,तात्याराम पोकळे ,मनोज कुलकर्णी ,विनायक राऊत ,अवधूत पवार ,राहुल उगले ,कूंडल राळेभात ,विकीभाऊ सदाफुले ,प्रदीप टापरे,संतोष नवलाखा ,डिगांबर चव्हाण ,संपत राळेभात , सुनील जगताप ,बाबा चंदन ,पारवे , तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
पंचमी कुठे त्या जागेबाबत तसेच विविध समस्यांवर बोलतांना सतत तेच तेच लोक बोलतांना दिसून आले .नागरिक कोणीही आपले मत मांडतांना दिसले नाहीत. नगरपरिषदच्या वतीने बीड रोडवरील एमआयडीच्या जागेवर पंचमी आनंद मेळा भरविण्याची तयारी झाली आहे असे सांगण्यात आले तेव्हा बाजार समितीचे सभापती शरद कारले यांनी सांगितले की बाजार समितीच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून आनंदमेळा भरविण्यात येतो .कोणत्याही प्रकारच्या अडचणी तेथे येत नाहीत तेव्हा यावर्षीही बाजार समितीच्या आवारात पंचमी आनंद मेळा भरविण्याची त्यांनी मागणी केली . मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली .
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले की या उत्सवात नागरिकांच्या आनंदाचा विचार करून नेहमीप्रमाणे या वर्षी आनंदमेळा जागेचा लिलाव होणार नाही. शांतता कमिटीची बैठक आहे तेव्हा सर्वांनी शांततेत बोलायला पाहिजे .सर्वानी आपला मुद्दा कींवा प्रश्न भांडण स्वरुपात न मांडता सुज्ञपणे, शांतपणे मांडावेत सर्वाच्या सुचनांचा विचार करून निर्णय केला जाईल,उत्सव काळात महिलांना व नागरिकांना येणाऱ्या समस्यांची जाणीव आहे .त्या समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद सक्षमपणे काम करीन असे प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले .
————————
तहसिलदार व मुख्याधिकारी प्रतिनिधी यांना बैठकीत बोलू दिले नाही.सदर प्रशासकीय अधिकारी कोणाच्या दबावाखाली होते?. नगरपरिषदने जागेबाबत एकतर्फी निर्णय घेतला आहे .
आनंदमेळा भरवण्याची जागा नागरिकांना मान्य नाही .ती जागा जाण्या येण्याच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही ती बदलण्यात यावी अशी मागणी नगरसेवक प्रशांत राळेभात ,अँड मयुर डोके, सुनिल जगताप , संतोष नवलाखा ,संपत राळेभात प्रदिप टापरे, विकीभाऊ सदाफुले यांनी केली आहे .
पंचमी आनंद मेळावा आणखी दोन तीन ठिकाणी भरविण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न होणार असल्याचे समजते .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!