लोकाभिमुख व संयमी नेतृत्व हरिभाऊ आजबे निवडणूक रिंगणात
केलेले कामं व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर प्रभाग ११ मधुन संधी मिळाल्यास नगरसेवकपदासाठी निवडणूक लढणार
जामखेड प्रतिनिधीः
जामखेड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधुन हरिभाऊ नारायण आजबे हे कोणतेही पद नसतांना जनतेचे केलेले काम व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर आ रोहित पवार यांनी संधी दिली तर नगरसेवकपदासाठी निवडणुक लढणार आहेत.
हरिभाऊ आजबे हे गेल्या २० वर्षापासुन शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे प्रमाणिक काम करत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रमाणिक काम केले. आ रोहित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून गावात सभामंडपाला मंजूरी मिळवली.जमादारवाडी ते नेटके वस्ती रस्त्यावर पुलाची मंजुरी मिळवली.
नेटके वस्ती ते जमादारवाडी पर्यंत मुरुम टाकून रस्त्यावरील नागरिकांना होणारा त्रास कमी केला. अनेक गरजू नागरिकांना आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेकांना वैद्यकीय गरजेवेळी मदत केली. शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध समस्या सोडविण्यासाठी मदत केली. प्रभागात महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना मदत केली. अनेकांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी बचत गटातुन कर्ज पुरवठा केला.
हरिभाऊ आजबे यांनी पक्षाचे कोणतेही पद नसतांना आ रोहित पवार यांच्या माध्यमातून जनतेचे विविध काम केले. प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याची मागणी मतदारांमधून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर हरिभाऊ आजबे हे संयमी असुन सामाजिक जाणीव असलेले सुजान व्यक्तिमत्व आहे. हरिभाऊ आजबे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडुन नगरसेवकपदासाठी इच्छुक आहेत.त्यांच्याबाबत प्रभाग क्रमांक ११ मध्ये मोठी सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.
आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या विविध अडीअडचणी समजून घेतात व त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष तत्पर असतात . कोरोना काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांना स्वतः नागरिकांमध्ये जाऊन मास्क हँडवाँश देत हिम्मत धैर्य देण्याचे काम केले.

संयमी आणि लोकाभिमुख स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक व विश्वासू सहकारी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या हरिभाऊ आजबे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणुकीला चुरस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झालें आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
