Homeव्हिडिओ बातम्याशेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध :- आमोल राळेभात

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध :- आमोल राळेभात

जवळा सोसायटीमार्फत नवीन कर्जदारांना पीक कर्जाचे वाटप

जामखेड प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कायम कटिबद्ध आहोत
जवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी संकरित गाया घेण्यासाठी धनादेश देण्यात आले आहेत तसेच नवीन व बिगर कर्जदार सभासदांना रब्बी पीक कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतले आहे असे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी सांगितले.
यावेळी १२९ नवीन सभासदांचे पीक कर्ज केसीसी खाती जमा करण्यात आले.
जवळा सोसायटी ही जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी संस्था असून या संस्थेचे ३०६० सभासद आहेत. संस्थेच्या कर्जदार सभासदांना १६ कोटी २६ लाख रु.कर्ज वाटप केलेले आहे. तसेच संस्थेने मागणी केलेल्या नवीन १२९ सभासदांना पीक कर्जासाठी ७५ लाख ९७ हजार तर १० सभासदांना संकरीत गायीसाठी २४ लाख रु.कर्ज मंजूर केले असल्याची माहिती बँकेचे संचालक श्री.अमोल दादा राळेभात यांनी दिली. जिल्हा बँक नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून बँकेच्या विविध कर्ज योजनेच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे. बँकेमध्ये कर्मचारी संख्या कमी असतानाही बँकेचे काम अत्यंत सुरळीत व वेळेत पूर्ण केले जात आहे.कर्ज वसूली ही संस्थेचा व बँकेचा कणा असून ज्याप्रमाणे आपण कर्ज घेतो. त्याप्रमाणे घेतलेले कर्ज फेडणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना शासनाकडून व्याज सवलत दिली जाते.त्यामुळे घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करून शासनाच्या व्याज सवलत रकमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जवळा सोसायटीतर्फे बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शहाजी आप्पा पाटील, व्हा. चेअरमन शिवाजी तुकाराम कोल्हे, संचालक बारस्कर नवनाथ पोपट, हजारे राजेंद्र रामचंद्र, लेकुरवाळे अविनाश काकासाहेब, मते काशिनाथ गहिनाथ, पागीरे चंद्रहार किसन, रोडे अरुण नामदेव, वाळुंजकर कैलास महादेव संचालिका शेख सायरा सत्तार , सचिव दादा चव्हाण राजेंद्र मोटे, राजाभाऊ सुळ, भाऊसाहेब सुळ, किसन गोयकर, कानिफनाथ मते, रामलिंग हजारे, हरिदास काळदाते तसेच संस्थेचे अनेक सभासद, कार्यकर्ते हजर होते.संस्थेचे चेअरमन शहाजी अप्पा पाटील यांनी बँकेचे संचालक अमोल राळेभात हे स्वत:चा संपूर्ण वेळ हा शेतकऱ्यांसाठी देत असल्याचा खास नामोल्लेख केला. बँकेमध्ये कर्मचारी संख्या खूपच कमी असतानाही बँक सेवक हे अत्यंत चांगली सेवा देत असल्याचे नमूद करून उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!