जामखेड प्रतिनिधी
भाजपा नेते, माजीमंत्री आ प्रा .राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कारले व उद्योजक आणि राजेंद्र देशपांडे यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील विविध गावातील शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .जवळा,धोंडपारगाव ,नान्नज पिंपरखेड आदी गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.शिक्षणामुळेच आपल्या जीवनात प्रगती होत असते.शिक्षण घेतांना गरिब कुटुंबातील मुलांना मदत करण्याच्या उद्देशाने आ प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
दि. १ जानेवारी रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व उद्योगपती राजेंद्र देशपांडे यांच्या वतीने जवळा जिल्हा परिषद गटातील कुसडगाव, जवळा, हाळगाव, आरणगाव, डोणगाव, पिंपरखेड, रत्नापुर, पाटोदा, चौंडी, कवडगाव, आघी, धानोरा, धोंडपारगाव, राजेवाडी, झिक्री, डिसलेवाडी, बावी, सांगवी, खामगाव, भोयकरवाडी, फक्राबाद, डोणगाव, भवरवाडी व खांडवी आदी गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले .यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या शालेय साहित्य वाटप प्रसंगी विविध ठिकाणी विविध पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
