Homeव्हिडिओ बातम्याशार्टसर्कीटमुळे भीषण आग ; मोठी हानी टळली मोठ्या उपाययोजना करण्याची गरज

शार्टसर्कीटमुळे भीषण आग ; मोठी हानी टळली मोठ्या उपाययोजना करण्याची गरज

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

एमएसईबीच्या परिसरातील कचरा व वस्तू जळाल्या

मोठी हानी टळली

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील विज वितरण कंपनी (MSCB) च्या प्रांगणात साचलेल्या कचऱ्याला शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना दि ११ रोजी घडली.

उन्हाच्या झळा व त्यातच आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवार बाजाराच्या दिवशी घडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, MSCBच्या परिसरात साचलेला कचरा आणि विद्युत यंत्रणेजवळील शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून आगीची सुरुवात झाली. सुरुवातीला लहान स्वरूपाची असलेली आग वाऱ्याच्या झोतामुळे झपाट्याने पसरू लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

दरम्यान, शनिवार बाजारामुळे मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी झाल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

नगरपरिषद ची अग्निशामक दलाचे कर्मचारी अहमद गड्डू भाई, यांच्यासह MSCB कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने पाण्याचे फवारे, बादल्या व उपलब्ध साधनांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग अधिक पसरली असती तर विज वितरण यंत्रणा तसेच आजूबाजूच्या दुकाने व नागरिकांच्या मालमत्तेला मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.

सदर घटनेमुळे विज वितरण कंपनीच्या प्रांगणात साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!