वाढदिवस समाजासाठी प्रेरणादायी ठरवा दत्तात्रय गोपाळघरे, तुळशीदास गोपाळघरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
आजच्या काळात वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. केक, पार्ट्या, फटाके आणि अनावश्यक खर्च यामुळे अनेकदा वाढदिवसाचा मूळ अर्थ हरवताना दिसतो. मात्र काही व्यक्ती आपल्या कृतीतून वाढदिवस साजरा करण्याला वेगळे आणि सामाजिक भान देणारे स्वरूप देतात. आरोग्य सल्लागार तुळशीदास गोपाळघरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेला उपक्रम हा त्याच सामाजिक जाणिवेचा एक प्रेरणादायी नमुना ठरला आहे.
याशिवाय बालगृहातील सर्व विद्यार्थ्यांना एक वेळचे भोजन देत त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण व्हावा, पुढील आयुष्यात मोठे होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी उपस्थित मान्यवरांनी त्यांना मार्गदर्शनही केले.
यावेळी तुळशीदास गोपाळघरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू मुलांसोबत वाटल्यास त्याचे खरे समाधान मिळते. समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
या प्रसंगी उपस्थित असलेले वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार दत्तात्रय गोपाळघरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आजच्या काळात समाजात संवेदनशीलतेची गरज अधिक आहे. तुळशीदास गोपाळघरे यांनी वाढदिवसासारखा वैयक्तिक दिवस समाजोपयोगी उपक्रमासाठी दिला, ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ साहित्यच मिळत नाही, तर त्यांना समाजाचा आधारही मिळतो. शिक्षणाच्या माध्यमातून ही मुले पुढे जाऊन समाजाचे चांगले नागरिक बनतील, हा विश्वास अशा उपक्रमांमुळे अधिक दृढ होतो. समाजातील इतरांनीही या उपक्रमातून प्रेरणा घेऊन गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे.”
या प्रसंगी आरोग्य सल्लागार भारत सानप, सावली फाउंडेशनचे संचालक दिपक गर्जे, अधिपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका प्रगती जायभाय यांच्यासह आरोग्य धनसंपदा परिवाराचे महाराष्ट्रातील मित्रमंडळी उपस्थित होती. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श समाजात रुजावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
RELATED ARTICLES






