वरून आदेश + आतून ऑफर. म्हणजे “तुम्ही माघार घ्या , आम्ही तुमच्या माणसाला सांभाळतो” असं झालं असावं. जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार मात्र संपूर्ण निवडणुकीवर डोळा आजिनाथ हजारे यांना संधी !
वरून आदेश + आतून ऑफर. म्हणजे “तुम्ही माघार घ्या , आम्ही तुमच्या माणसाला सांभाळतो” असं झालं असावं.
जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार
मात्र संपूर्ण निवडणुकीवर डोळा
आजिनाथ हजारे यांना संधी !

सिटीझन प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केले .या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे .कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी सखोल चर्चेनंतर त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे बोलले जात आहे.
राम शिंदे विधान परिषदेचे सभापती आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षाने सांगितलं “बँक बिनविरोध करा, वाद नको” तर त्यांना ऐकावंच लागेल.
संगमनेर बैठकीत थोरात यांनी पुढाकार घेतला होता, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरून आदेश येणं शक्य आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारला बँकेचं राजकारण नकोय.असेही असु शकते .
राम शिंदे सहजासहजी माघार घेणारे नेते नाहीत. त्यांनी 361 अर्ज विकले जाण्यापर्यंत वातावरण तापवलं होतं.
त्यामुळे त्यांना नक्कीच काहीतरी मोठं दिलं असणार एकतर कर्जत-जामखेडची जागा त्यांच्या विश्वासु माणसाला (मंजूषा गुंड / आजिनाथ हजारे), किंवा पुढच्या चेअरमन/व्हाईस चेअरमन पदावर शब्द दिला असेल का ?

विशेष म्हणजे
विखेंनी कालच म्हटलं होतं – “खलबतं करायला खूप वेळ आहे” म्हणजे डील शिजत होती.
वरून आदेश + आतून ऑफर. म्हणजे “तुम्ही माघार घ्या , आम्ही तुमच्या माणसाला सांभाळतो” असं झालं असावं.

दरम्यान, उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर उद्या (दि. ६) अर्जाची छाननी होणार असून बुधवारपासून वैध अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. माघारीनंतर निवडणूक बिनविरोध न झालेल्या जागांसाठी २ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे.सभापती राम शिंदे यांच्या माघारीमुळे अजून नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण अजून पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव या ठिकाणी उमेदवारीवरून तेढ निर्माण झाला आहे. यामुळे सर्वपक्षीय नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत.
———-
बिनविरोधचा मार्ग मोकळा आहे का ?
—————
राम शिंदे यांनी अर्ज घेतला होता,पण अर्ज न भरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. पण जर ते मागे हटले तर कर्जत-जामखेड सोसायटीची जागा बिनविरोध होण्याची शक्यता 90% वाढली. पालकमंत्री विखे आणि थोरात यांचा जो संगमनेर प्लॅन होता तोच यशस्वी होईल?

विशेष म्हणजे राम शिंदे मागे हटले म्हणजे त्यांना मोठी ऑफर मिळाली असणार का ? एकतर जिल्हा बँकेच्या चेअरमन / व्हाईस चेअरमन पदाचं आश्वासन, किंवा कर्जत-जामखेडमध्ये त्यांच्या माणसाला (मंजूषा गुंड / अजिनाथ हजारे) जागा सोडणे.असे असणार का ?
आता सगळ्यांचं लक्ष शिंदे यांची ही माघार खरोखर बिनविरोधसाठी आहे का, की ते शेवटच्या दिवशी ६ आँक्टोंबर ला काय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .कारण आत्तापर्यंत त्यांचा सस्पेन्स असाच होता.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!