पंकजाताईंं मुंडें यांचे स्वागत खा सूजय विखे यांनी केले.
जामखेड प्रतिनिधी
लोकनेत्या पंकजाताई मुंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा डॉ. सुजय विखे पाटील,आमदार मोनिकाताई राजळे आणि शिवाजी राव कर्डिले यांनी यथोचित उत्साहात स्वागत केले.
त्यानंतर पाथर्डी शहरात ग्रामस्थांच्या वतीने पंकजाताईंचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन दर्शविले. तसेच पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत मोहोटादेवी येथे श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. सुजय दादांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे मत मांडले. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.