लोकांचे काम नाही होत मग पदाचा काय फायदा :
डोणगाव ग्रामपंचायत सदस्या सूरेखा फूलेंचा राजीनामा :
जामखेड प्रतिनिधी
ग्रामपंचायत सदस्य म्हणून चार वर्षांत नागरिकांचे काहीच काम करू शकले नाही अडवणूक करणारया ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून
जामखेड तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा फुले यांनी आपल्या राजीनामा दिला आहे.
तसे लेखी पत्र डोणगाव ग्रामपंचायत सरपंचाकडे देत राजीनामा मंजुर करण्याची मागणी केली आहे.
राजीनामा पत्रात म्हटले आहे की
दलितांची सर्वागीन विकास कामे व्हावीत यासाठी मी माझ्या चार वर्षाच्या कार्य काळात वेळोवेळी प्रयत्न केले तसेच माझ्या मागणी कामातील वाघमारे वस्ती, गायकवाड वस्ती याठिकाणी कसलीही दखल घेतली नाही.
तसेच आमच्या अस्मीतेचा प्रश्न असणारे बौद्ध विहार यासाठी गावात जागा उपलब्ध करून दिली जात नाही. रमाई घरकुल लाभार्थाना घर मंजुर असून जागे अभावी त्यांचे घरे रखडली आहेत मग मी जर एवढा पाठपुरावा करून काहीच कामे होत नसतील तर मी पदावर राहून काय फायदा? असा संतप्त सवाल उपस्थित करून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
साठी मी माझ्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजीनामा पत्र दिले असून माझा राजीनामा मंजुर करावा असे ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा पोपट फुले यांनी निवेदन पत्रात म्हटले आहे.
ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन च्या दलित महिला ग्रामपंचायत सदस्या असुन गेल्या चार वर्षा पासुन त्या काम करत आहेत मात्र त्यांनी सुचविलेले काम. तसेच त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला तरी पण कोणतेही काम संबंधितांनी केले नाही.
त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे आणि या सर्व नैराश्यातुन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाचे लेखी पत्र सरपंच यांना दिले आहे. तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या दलील महिलांनी आमचे प्रश्न पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

डोणगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ.प्रिंयका यादव यांनी अद्याप राजीनामा पत्रावर काहीही निर्णय अद्याप घेतला नाही त्यामुळे सौ सुरेखा फुले यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नसल्याचे समजते आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
