अहमदनगर येथुन मनोज जरांगे पाटील व आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आसलेल्या लाखो आंदोलकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जामखेड तालुक्यातुन मदतीसाठी ५०० स्वयंसेवक जाणार आहेत आशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या घेण्यात आलेल्या बैठकीत सांगण्यात आले. तसेच पन्नास हजार लोकांना पुरेल एवढा कोरडा शिधा देखील जामखेड तालुक्यातुन तयार करून पाठवण्यात येणार आहे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने व मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या आनुशंगाने शुक्रवार दि १२ जानेवारी रोजी सकाळी जामखेड येथे नियोजन बैठक संपन्न झाली. या वेळी जामखेड तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रा.कविता जगदाळे, डॉ. पल्लवी सुर्यवंशी व शिवगंगा मत्रे यांच्या हस्ते करून जिजाऊ वंदना घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यावेळी प्रा. (आबा)मधुकर राळेभात यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ पल्लवी सुर्यवंशी मॅडम, प्राध्यापिका कविता जगदाळे, जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून शिवगंगा मत्रे हिने मी जाजाऊ बोलतेय या विषयावर नाटीका सादर करुन आजच्या समाज्याची भरकटलेली परीस्थिती नीट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना साद घालून आपली कला सादर केली.
जिजाऊ जयंती निमित्त कार्यक्रम झाल्या नंतर मराठा क्रांती मोर्चा जामखेडचे स्वयंसेवक केदार रसाळ यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजना बाबत बोलताना सांगितले की मुंबई येथील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दि १५ जानेवारी पर्यंत जामखेड तालुक्यातील विविध गावात मॅरेथॉन बैठका घेऊन पुढील आंदोलना विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. नगर येथुन मनोज जरांगे पाटील व आंदोलक मुंबईच्या दिशेने जात असलेल्या लाखो आंदोलकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जामखेड तालुक्यातुन ५०० स्वयंसेवक हे नगर येथे जाणार आहेत तर जामखेड तालुक्यातुन पन्नास हजार बांधवांना पुरेल एवढा कोरडा शिधा तयार करून पाठवण्यात येणार आहे. ज्या स्वयंसेवकांना काम करायचे आहे त्यांच्यासाठी दि १५ जानेवारी पासून जामखेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनकडे फॉर्म उपलब्ध आसणार आहेत. तसेच मुंबई येथील मराठा मोर्चासाठी जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावातुन तीन ते चार वहाने निघणार आसल्याची माहिती केदार रसाळ यांनी दिली.
यासीन शेख 9423391215