जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती येथील अश्विनी आण्णा नेमाने (वय १७ ) या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विनी नेमाने हि शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहे. आई वडील जामखेड शहरातील एका वीटभट्टीवर कामाला असतात सकाळी दोघेही कामाला गेले असता अश्विनी कॉलेजला गेली होती. .कॉलेज सुटल्यावर घरी आली घरातील घरकाम केले व नंतर घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.सायंकाळी आई वडील घरी आल्यावर ही घटना लक्षात आली तेव्हा ताबडतोब ग्रामीण रुग्णालय दाखल केले .त्याठिकाणी डॉक्टरांनी मयत झाली असल्याचे सांगितले . आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. घटना समजताच पोलीस निरीक्षक महेश पाटील घटनास्थळी भेट दिली.मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे .


जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करीत जामखेड पोलिस करत आहेत .
