मतदार यादी पुनर्निरीक्षण कामाला मुदत वाढवून द्या : एसआयआर राष्ट्रीय प्रक्रिया ;शासनाकडून पाहिजे तेवढी जनजागृती नाही .जामखेडमध्ये विशेष कँम्पचे आयोजन
एसआयआर राष्ट्रीय प्रक्रिया ;
RELATED ARTICLES
अशी नागरिकांमधून मागणी केली जात आहे. प्रशासकीय नियोजनात गंभीर त्रुट्या आहेत .सध्या बीएलओ (BLO) यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. अत्यंत कमी कालावधीत त्यांना मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे.१५ दिवसांत १२ ते १५ हजार मतदारांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे .सध्याच्या नियोजना नुसार,केवळ १५ दिवसांच्या अत्यंत अल्प कालावधीत साधारणपणे १२ ते १५ हजार मतदारां पर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे कोणत्याही बीएलओ कर्मचाऱ्याला शक्य नाही. कामाचा हा प्रचंड आवाका पाहता ही प्रक्रिया घाईघाईने उरकली जाण्याची भीती वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार थेट परिणाम प्रशासनाच्या या घाईगडबडीचा आणि माहितीच्या अभावाचा मोठा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार आहे.सध्या सूरू असलेल्या कामाची पद्धत व गती पहाता मतदारांची नावे किंवा आवश्यक नोंदी वेळेत पूर्ण न झाल्यास,हजारो नागरिक आपल्या मतदानाच्या पवित्र हक्कापासून मुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आजही व्यापक जनजागृतीची मोठी गरज आहे .
शासनाने विविध माध्यमांतून या प्रक्रियेची रीतसर माहिती आणि व्यापक जाहिरात करून नागरिकांमध्ये जागृती करावी. आजपासून फक्त १४ दिवस उरले आहेत .वेळ वाढवून देऊन बीएलओ आणि मतदार दोघांनाही पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा.”प्रशासनाने कोणतीही घाई न करता, सर्वसामान्य मतदारांचे हित लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे.जर नागरिकांना प्रक्रियेची माहितीच नसेल आणि बीएलओ मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत,तर लोकशाहीचा मूळ उद्देशच धोक्यात येईल. म्हणूनच तहसील प्रशासनाने सध्या चालू असलेल्या प्रक्रियेचे नीट निरिक्षण करून नीट अहवाल द्यावा व नागरिकांच्या, मतदारांच्या हितासाठी शासनाने या प्रक्रियेला तात्काळ मुदतवाढ दिली पाहिजे.” असा अहवालात माहिती देतांना तहसिलदार यांनी द्यावा