Homeव्हिडिओ बातम्याभर दुपारी प्रवाशाचे ४० हजार रुपयांचे दागिने लंपास :जामखेड बसस्थानकावर चोरीच्या घटनांमध्ये...

भर दुपारी प्रवाशाचे ४० हजार रुपयांचे दागिने लंपास :जामखेड बसस्थानकावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ :नवीन बस स्थानक इमारत मुख्य रस्त्यापासून आडबाजूला ;चोरट्यांच्या सोईची ठरत आहे.

भर दुपारी प्रवाश्याचे ४० हजारांचे दागिने लंपास
जामखेड बसस्थानकावर घटनेत वाढ
नवीन बस स्थानक इमात मुख्य रस्त्यापासून आडबाजूला ; चोरांच्या सोईची ठरत आहे:

जामखेड प्रतिनिधी :

जामखेड बसस्थानकावर दिवसेंदिवस पाकीटमारी सोन्याचे दागिने चोरी मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. प्रवाशांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि २५ जानेवारी २०२६ रोजी बसस्थानकावर दुपारी सिंधु अशोक पाचारणे (वय ५३ वर्षे, व्यवसाय – मिरची व्यापारी, रा. कडा, ता. आष्टी , जि. बीड) यांच्या पर्समध्ये ठेवलेले ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले.

याप्रकरणी दि ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सिंधू अशोक पाचरणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ६२/२०२६, कलम ३०३(२) (चोरी) अंतर्गत अज्ञात चोरटय़ांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस प्रवासादरम्यान लबाडीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय आर्थिक फायद्यासाठी दागिने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करीत आहेत.
नवीन बसस्थानकाचा इमारतीचे काम मोठे झाले आहे. सदर बस स्थानक इमारत मुख्य रस्त्यापासून आडबाजूला पडत आहे. तो परिसर भुरट्या चोरांना सोईचा पुरक ठरत आहे. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!