Homeव्हिडिओ बातम्याबापरे! जामखेडला दूध भेसळ ; एम डी ड्रग्ज पकडले. फक्राबाद येथे केमिकल...

बापरे! जामखेडला दूध भेसळ ; एम डी ड्रग्ज पकडले. फक्राबाद येथे केमिकल दूध भेसळ रँकेटचा पर्दाफाश : पोलिसांच्या कारवाईने जामखेड मध्ये खळबळ

बापरे! जामखेडला दूध भेसळ; एम डी ड्रग्ज पकडले

फक्राबादमध्ये केमिकल मिसळून दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात खळबळ

जामखेड प्रतिनिधी

नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे रँकेट जामखेड तालूक्यात सक्रिय असल्याचा पर्दाफाश झाला आहे.
जामखेड शहर व तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून फक्राबाद येथे केमिकल मिसळून दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जामखेड शहरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत संशयिताकडून अंदाजे १० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. संबंधित व्यक्तीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळ प्रकरणावरही पोलिसांनी धडक कारवाई केली. केमिकल व इतर पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांची तपास प्रक्रिया चालू आहे अनेक लोक यात सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!