जामखेड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियान निमित्ताने भाजपा यूवा मोर्चाचे जामखेड तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी जामखेड बांधखडक येथे शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला . राज्याचे माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व यूवा मोर्चाचे अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांच्या नेतृत्वाखाली बूथ प्रमुख, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधखडक गावात जाऊन भेटी देत शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली .देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना व विकासकांमा बद्दल बांधखडक ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली .हे अभियान राबविताना जनतेच्या मनात भजपाविषयी व पक्षाच्या नेतृत्वाबाबत अस्था व प्रेम निर्माण करण्याचे काम केले.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन बाजीराव गोपाळघरे यांनी केले. तसेच या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी गावातील सामान्य माणसांच्या अडचणी ऐकुन घेतल्या व त्या संबधित प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाजीराव गोपाळघरे यांनी सांगितले .यावेळी भाजपा युवा नेते केशव अण्णा वनवे,सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी पाटील, यूवा नेते अनिल दराडे , भारत होडशीळ, अर्जुन दराडे,चेअरमन सखाराम वनवे, रोहित वनवे, सुशांत चव्हाण, छगन वनवे तसेच बांधखडक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.तसेच या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी गावातील सामान्य माणसांच्या अडचणी ऐकुन घेतल्या व त्या संबधित प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाजीराव गोपाळघरे यांनी सांगितले .