Homeव्हिडिओ बातम्यातहसीलदारांची बदली मनाला चटका लावणारी :- रमेश आजबे

तहसीलदारांची बदली मनाला चटका लावणारी :- रमेश आजबे

विविध स्तरांतून तहसीलदारांना शूभेच्छा

जामखेड प्रतिनिधी

तहसीलदार योगेश चंद्रे यांची नूकतीच जामखेडहुन बदली झाली आहे . मागील दोन वर्षांत सर्वसामान्य जनता व शेतकरयाचे न होणारे रखडलेले अनेक वैयक्तिक कामे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी निस्वार्थी पणे मार्गी लावली आहेत . सर्वसामान्य माणसांच्या कामाला प्राधान्य देणारया तहसीलदाराची बदली ही मनाला चटका लावणारी आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी व्यक्त केले . जामखेडला रूजु झाल्यानंतर
तालुक्यातील किचकट असणारे बांध रस्ता बाबतचे प्रकरणे व इतर शासकीय कामे करताना वेळेचे भान न ठेवता आपले कामकाज करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तहसिल कार्यालयात येताना कोणत्याही दलालांची मदत जनतेला दोन वर्षांत घ्यावी लागली नाही हे विशेष नोंद करण्यासारखी बाब आहे. सर्वसामान्य लोकांची कदर करणारे असे व्यक्तिमत्त्व असणारया तहसीलदाराची बदली इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते .मात्र इतक्या लवकर अनपेक्षित झालेली बादली जामखेड करांच्या मनाला चटका लावून गेली .तसेच तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेडला काम करत असतांना आलेला अनुभव व पूढे जात असतांना न कळत काही चूका झाल्या असतील तर त्याबद्दल नम्रपणे मागितलेली जामखेड तालुक्यातील जनतेची माफी या पोस्टमूळे जनतेच्या मनात आदरभाव वाढला आहे .राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील लोकांपासून सर्व सामन्य माणसं ज्यांचा तहसीलदारांशी आलेल्या अनूभवामुळे व्यथित शब्दात पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देता व्यक्त करत आहेत .

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!