Homeव्हिडिओ बातम्याबस स्थानक असुविधांच्या विळख्यात ,वृद्ध महिला नागरीक प्रवाशी त्रस्त ,गावपुढारयांचे व प्रशासनाचे...

बस स्थानक असुविधांच्या विळख्यात ,वृद्ध महिला नागरीक प्रवाशी त्रस्त ,गावपुढारयांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष पावसाळ्यात मोठे हाल ; नान्नज ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

बस स्थानक असुविधांच्या  विळख्यात विद्यार्थी, वृद्ध महिला पुरूष नागरिक त्रस्त

गावपुढारयांचे व प्रशासनाचे दूर्लक्ष

पावसाळ्यात मोठे हाल

नान्नज ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील नान्नज या गावातील बस स्थानकाची व परिसराची तसेच मुख्य रस्त्याची मोठी दूरावस्था झाली आहे .रस्त्यावर मोठमोठे खड्डे व त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, वृद्ध नागरिकांना चालणे अवघड झाले आहे . या गंभीर विषयाकडे गावपुढारयांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .

संबधित प्रशासनाला दूरूस्ती ची मागणी करून पाठपुरावा केला आहे .लवकरात लवकर मुख्य रस्ता व बस स्थानकाच्या परिसरातील रस्त्यांच ददुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे  ग्रामस्थांनी  सांगितले आहे .नागरिक आणि बसचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याची अवस्था बिकट असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बस स्थानक हा गावातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असल्याने दररोज शेकडो प्रवासी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचते आणि वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी घसरणे, अपघात होण्याचा धोका वाढला असून पादचाऱ्यांनाही चिखलातून वाट काढावी लागत आहे.खराब रस्त्यामुळे एसटी बसचालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

बस चालकाला बस सावकाश चालवावी लागत असल्याने वाहतुकीला विलंब होत असून प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असल्याचे सांगितले.

मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, तसेच बस स्थानक परिसरातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्नयाःच दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!