Homeव्हिडिओ बातम्याप्रभाग क्रमांक सात मधून पत्रकार मिठ्ठलाल नवलाखा निवडणूक रिंगणात, जनतेच्या प्रश्नांना वाचा...

प्रभाग क्रमांक सात मधून पत्रकार मिठ्ठलाल नवलाखा निवडणूक रिंगणात, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार नगरसेवक पदासाठी रिंगणात

जामखेड नगरपरिषद निवडणूक मध्ये प्रभाग 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून पत्रकार मिठुलाल नवलाखा रिंगणात; बदलावाचा ध्यास

जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार आता नगरसेवकपदासाठी रिंगणात

जामखेड प्रतिनिधी

नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ब मधून शहरातील निर्भीड आणि सक्रीय पत्रकार म्हणून ओळख असलेले मिठुलाल पोपटलाल नवलाखा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (अजित पवार गट) घड्याळ चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली आहे. पत्रकार नवलाखा यांच्या या निर्णयाने प्रभागातील राजकीय समीकरणात चुरस निर्माण झाली आहे.

पत्रकारितेद्वारे वर्षानुवर्षे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामाजिक प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणारे मिठुलाल नवलाखा आता थेट जनप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी काम करण्याचा निर्धार घेऊन मैदानात उतरले आहेत.

मागील निवडणुकीच्या वेळीं काही मतांनी हुलकावणी दिल्याने प्रभागातील जनते मध्ये हळ हळ व्यक्त होत होती. धार्मिक आणि सुशिक्षित लोकांना बरोबर घेऊन तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ पाहून प्रभागातील नागरिक नवलाखा यांचे काम करत आहेत.

— “फक्त टीका करून चालत नाही, शहर बदलायचे असेल तर व्यवस्थेत उतरून काम करणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी विकासाचे स्पष्ट धोरण पुढे मांडले आहे.

सामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण, पारदर्शक कामकाजाची वचनबद्धता आणि भ्रष्टाचारमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वप्न घेऊन पत्रकार मिठुलाल नवलाखा यांनी परिवर्तनाचा नारा दिला आहे .तसेच विविध सामाजिक कामासह धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असतात.

स्थानिक नागरिकांनीही या उमेदवारीचे स्वागत केले असून, “न्यायासाठी लढणारी व्यक्ती आता आमच्या विकासासाठी लढणार ही विश्वासाची बाब आहे,” अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

  पत्रकार मिठुलाल नवलाखा यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग ७ मधील ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!