Homeव्हिडिओ बातम्यापोलिस बंदोबस्तात व्यस्त फक्राबाद येथे दरोडा .मारहाण करत दोन लाखांचा ऐवज...

पोलिस बंदोबस्तात व्यस्त फक्राबाद येथे दरोडा .मारहाण करत दोन लाखांचा ऐवज लूटला .गंभीर जखमींवर पुण्यात उपचार

एकीकडे अहिल्यादेवी होळकर जयंती बंदोबस्तात पोलिस व्यस्त दुसरीकडे पडला दरोडेखोरांनी .

फक्राबाद दरोड्यात   १ लाख ९० हजार लूटले

तीनजण गंभीर जखमीं; पूणे येथे उपचार

जामखेड प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने जामखेड तालुक्यात चौडी व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता अशा वेळी देखील दरोडेखोरांनी फक्राबाद येथे दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लूटत चार जणांन मामारहाण करत गंभीर जखमी केले.

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे ७ ते ८ दरोडेखोरांच्या टोळीने आढाववस्ती येथे दरोडा टाकत कोयत्याने केलेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच घरातील १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. या घटनेत मारहाणीत तीन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. फक्राबाद येथील दरोड्याच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरोडेखोरांच्या मारहाणीत फीर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढावा वय ४८, अंगद अण्णासाहेब आढाव, मैनाबाई मधुकर पारे व वृध्द महीला सुभद्रा आण्णासाहेब आढाव हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फीर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढावा या आपल्या कुटुंबा समवेत फक्राबाद येथील आढाव वस्ती या ठिकाणी घरासमोरील पडवीमध्ये झोपले होते. या वेळी ३१ मे २०२६ रोजी रात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास ७ ते८ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने फीर्यादी यांच्या घरासमोर येऊन पडवी मध्ये झोपलेल्या चार जणांवर कोयता गज व काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये फीर्यादी कौशल्या आण्णासाहेब आढावा वय ४८, अंगद अण्णासाहेब आढाव, मैनाबाई मधुकर पारे या तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे तर वृध्द महीला सुभद्रा आण्णासाहेब आढाव यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू आहेत.यानंतर दरोडेखोरांच्या टोळीने घरामध्ये प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील रोख ४० हजार रूपये व दीड लाख रूपयांचे साडेतीन तोळे सोने असा एकुण १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला. यानंतर आरडाओरडा झाल्यावर आजुबाजुच्या वस्तीवरील लोक घटनास्थळी धावत आले मात्र तो पर्यंत दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या प्रकरणी फीर्याद कौशल्य आण्णासाहेब आढावा यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करित आहेत.

चौकट

चोंडी येथे दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्रीसह अनेक मंत्री येणार असल्याने पोलिसांचा मोठा राबता होता. चोंडी ते फक्राबाद हे १२ कि. मी. चे अंतर आहे. रात्रभर वाहनांची वर्दळ असताना दरोडेखोरांनी दरोडा टाकून तीन जणांना कोयत्याने मारहाण करून जखमी केले. सदर घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट पाचारण केले. परंतु अद्याप तपासात प्रगती नाही.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!