पै. चिराग आजबे साकत जिल्हा परिषद गटातुन करणार उमेदवारी
शेतकरयांचा आग्रह
जामखेड प्रतिनिधी
शेतकरयांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करणारे. शेतकरयांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नरत असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मंगेश आजबे यांचे चिरंजीव पै चिराग आजबे कुस्ती मैदानातून राजकारणाच्या मैदानात जिल्हा परिषद साकत गटातुन निवडणुक लढत बाजी मारणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षाकडे तिकिटासाठी प्रयत्न करताना उमेदवार दिसून येत आहेत.
आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला जात आहे. साकत गटातून पै. चिराग आजबे हे कुस्तीच्या फडातून थेट राजकारणात साकत गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढविणार असुन ते प्रबळ दावेदार ठरत आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण रंगू लागले आहे त्यामुळे रंगत देखील वाढणार आहे.
साकत गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेला आहे.
औराष्ट्रवादीचे नेते मंगेश आजबे यांचे चिरंजीव पै. चिराग आजबे हे साकत जिल्हा परिषद गटासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कुस्तीच्या फंडातून थेट राजकारणाचा मैदानात त्यांनी प्रवेश केला असून गावोगावी कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा त्यांना लाभत आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट असून खर्डा, साकत गट सर्वसाधारण तर जवळा गट ओबीसी महिला राखीव पडला असून प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी हालचाली वाढविल्या आहेत. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या व नव्याने झालेल्या साकत जिल्हा परिषद गटातून अनेक चेहरे समोर येत आहेत.
यातच
चिराग आजबे यांच्या माध्यमातून युवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. चिराग आजबेंचे वडील मंगेश आजबे यांचा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास सर्वच गावात दांडगा जनसंपर्क आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मंगेश आजबे यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. शेतकरयांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मराठा समन्वयक म्हणूनही त्यांनी मोठं काम तालुक्यात केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मंगेश आजबे यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होता.
आजबे यांनी तालुक्यात संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. साकत जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व भाजप कडुन इच्छुकांची संख्या वाढणार आहे. मंगेश आजबे यांचा वाढता प्रभाव चिराग आजबे यांच्यासाठी फलदायी ठरणार आहे असे कार्यकर्तयांमधुन बोलले जात आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
