Homeव्हिडिओ बातम्यापुर्ववैमनस्यातुन सागर मोहळकरवर गोळीबार गावठी कट्टा जिवंत काडतुससह मुद्देमाल जप्त ...

पुर्ववैमनस्यातुन सागर मोहळकरवर गोळीबार गावठी कट्टा जिवंत काडतुससह मुद्देमाल जप्त आरोपी जामखेड पोलीसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेने केली झिक्रि शिवारात कारवाई

 

पुर्ववैमनस्यातुन सागर मोहळकरवर गोळीबार

गावठी कट्टा जिवंत काडतुससह मुद्देमाल जप्त

आरोपी जामखेड पोलीसांच्या ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेने केली झिक्रि शिवारात कारवाई

 जामखेड प्रतिनिधी

कुख्यात गुन्हेगार पै सागर मोहळकरवर गोळीबार प्रकरणातला एकजण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतला ताब्यात. झिक्री शिवारात सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपी अभिमन्यू महादेव पोतेला घेतले ताब्यात.

दि 04/03/2026 रोजी रात्री 07.30 वा. चे सुमारास तपनेश्वर रोड ते खाडेनगर जाणारे रोडवरील नुराणी कॉलनी या ठिकाणी आरोपींनी मोटारसायकलवर येवुन पैलवान सागर किसन मोहळकर याचेवर गावठी कट्टयातुन गोळीबार करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

सदर घटनेबाबत किसन चांगदेव मोहळकर रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 122/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 (1), सह आर्म ऍक्ट 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जामखेड या ठिकाणी फायरिंगची वरीलप्रमाणे घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरणकुमार कबाडी, यांनी घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली.

सदर गुन्हा हा पुर्ववैमन्यस्यातुन घडलेला असल्याची शक्यता असल्याने सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश देण्यात आले. सदर आदेशानुसार सपोनि/हरिष भोये, पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डीले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, भगवान धुळे यांची दोन पथके तयार करून सदर पथकास सुचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले.

पथकाने घटनाठिकाणी पाहणी करून पथक घटनाठिकाणचे आजुबाजुची व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यात आली. तसेच पैलवान सागर मोहळकर याचे यापुर्वीचे पुर्व वैमनस्याबाबत माहिती घेवुन आरोपींची माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा अभिमन्यु पोते रा. जामखेड व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची व तो झिक्री , ता. जामखेड गांवचे शिवारामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ झीक्री गावचे शिवारात जावुन आरोपी अभिमन्यु महादेव पोते वय 24 वर्षे, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड यास ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातील इसमाकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने सांगितले की चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, पुर्ण नांव माहित लाटी, रा. शास्त्रीनगर, कोथरूड पुणे (फरार), रोहित विठ्ठल आखाडे रा. शास्त्रीनगर, कोथरूड पुणे (फरार), चिन्या पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरूड पुणे (फरार), असे मागील वादाचे कारणावरुन सागर मोहळकर यास जिवे ठार मारण्यासाठी जामखेड या ठिकाणी आले होते. दिनांक 04/03/2026 रोजी मी पैलवान सागर मोहळकर याचे हालचालीची माहिती वरील इसमांना दिली. त्यानंतर त्यांनी त्यांचेकडील गावठी कट्टयातुन सागर मोहळकर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचेवर परिंग केली असल्याची कबुली अभिमन्यू पोते याने दिली आहे.

ताब्यातील आरोपी अभिमन्यु महादेव पोते याचेकडुन गुन्ह्यामध्ये फायरिंगकरीता वापरलेला 35,000/- रुपये किमतीचा गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व 01 जिवंत काडतुस, 40,000/- रुपये किमतीची गुन्ह्यामध्ये वापरलेली विना नंबरची ज्युपीटर मोटारसायकल, 15,000/- रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण १०,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीला गुन्ह्याचे पुढील तपासासाठी जामखेड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस तपास करीत आहेत.

 

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!