नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करणार :- महेश पाटील
पतंग उडवा पण नायलॉन मांजा नको
शालेय मूलांमध्ये पोलिसांनी केली जनजागृती
जामखेड प्रतिनिधी
मकरसंक्राती सणाच्या अनुषंगाने पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजाचे जीवावर बेतणारे धोकादायक परिणाम नागरिकांना चांगले ठाऊक आहेत. नायलॉन मांजा वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जामखेड हद्दीतील कोणी दूकानदारांनी नायलॉन मांजा विक्री करू नये तसेच कोणीही जवळ बाळगू नये तसे आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला आहे.
नायलॉन मांजाबाबत जनजागृती व्हावी याकरिता दि १३ जानेवारी रोजी दूपारी ४ वाजता शहरातील ल.ना.हौसिंग विद्यालय व नागेश विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीना मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना मांजाचा वापर करू नये बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस नंदकुमार सोनवलकर यांनी जनजागृतीपर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पो काँ प्रविण इंगळे पो काँ अविनाश ढेरे पो काँ प्रकाश जाधव पो काँ विकास वांढरे यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
तसेच जामखेड बाजारपेठेतील पतंग खरेदी विक्री दुकानदारांना मांजा खरेदी विक्री करु नये अथवा जवळ बाळगु नये या बाबत जनजागृती करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन हद्दीतील व्हॉटसॲप/सोशल मिडीयाचे माध्यमातुन नॉयलॉन मांजा वापर, विक्री व खरेदी होवु नये या करीता जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे साध्या वेशातील पोलिसांकडून मांजा विक्री दुकानाची वेळो वेळी तपासणी करण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी दिली.