Homeव्हिडिओ बातम्यानायलॉन मांजाने पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी मांजा विक्री थांबवा:- महेश पाटील

नायलॉन मांजाने पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी मांजा विक्री थांबवा:- महेश पाटील

नायलॉन मांजाने पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी
मांजा विक्री थांबवा:- महेश पाटील
जामखेड प्रतिनिधी
बंदी असतांना नायलॉन मांजा विक्री विक्री चालूच आहे. नुकताच या नायलॉन मांजाने पोलीस उपनिरीक्षक दिपक पारदे यांना गंभीर जखमी केले आहे. दि १४/०१/२०२५ रोजी ०९/४५ वा सुमारास बीड बायपास येथे पोलीस उपनिरीक्षक दीपक उत्तमराव पारदे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजी नगर ग्रामीण हे त्यांच्या मोटरसायकल वरून दैनंदिन ड्युटीवर करिता येत असताना त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला.

त्या मांजाने गळा कापला गेल्याने ते गंभीर जखमी झाले .आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तातडीने खाजगी सिग्मा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता भरती केले. नायलॉन मांजा मुळे झालेले गळ्याच्या जखमेवरती ऑपरेशन झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागांमध्ये उपचार सुरू आहेत.
या गःभीर घटनेचा संदर्भ देत जामखेड शहरासह तालुक्यात कोणीही नायलॉन मांजा विक्री करत असेल तर ते थांबवा. मांजा विक्री करतांना नागरिकांच्या निदर्शनास आले तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा व अशा घटना टाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!