तोंडावर दसरा दिवाळी व्यावसायिकांची प्रशासनाने केली होळी
अतिक्रमणे काढणे क्रमप्राप्त पण वेळ चुकली !
समर्थ हाँस्पीटल पासून कारवाईस प्रशासन असमर्थ ;
मोजणी ,हद्द खुणानाट्य ;कारवाई पार्ट 2
संयुक्त कारवाई मग सर्व यंत्रणा हजर का नाही
व्यापारयांचा विरोध नाही; प्रशासनात समन्वय नाही
तहसिलदार हाकतात उंटावरून शेळ्या ?


अनेक वेळा बीड रोडवरून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होते आणि समर्थ हाँस्पीटल जवळ येऊनच थांबते.तेथेच प्रशासन का असमर्थ ठरत आहे हे अद्याप कळले नाही ? नालिपासुन दहा फूट अंतरात सरसकट अतिक्रमणे काढण्यात येणार सांगितले .कोणाच्याही दबावाखाली न येता सर्वाना समान न्याय देणार.नियमातच अतिक्रमणे काढणार असे सांगितले मात्र समर्थ हॉस्पिटल नंतरच मोजणी ,हद्द खूणा हे नाट्य का चालू झाले हाही प्रश्नच आहे .याबाबत दुकानदारांमध्ये अद्याप संभ्रम आहे .नाली झाली नाही तेथे महामार्गाच्या हद्द खूणा झाल्या नाही तर मग न्यायालयाच्या आदेशानुसार संयुक्त मोजणी केली .तेव्हाच खूणा का नाही केल्या ? एवढी मोठी अतिक्रमणं काढण्याचे ठरले मग कारवाई चालू करण्याअगोदरच हद्द खूणा का नाही केल्या ? ऐनवेळी कारवाई थांबल्यानंतर व्यापारी व मालमत्ता धारकांमध्ये संभ्रम व संशय निर्माण झाला .याला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावरून प्रशासनात समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसत आहे .


दुकानदार व्यापारी व्याकूळ होऊन आधिकारयांच्या तोंडाकडे पहातात आणि आधिकारी एकमेकांवर टोलवाटोलवी करतात असा प्रकार पहायला मिळत आहे .