तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन संधी द्या :- रमेशभाऊ गुगळे.
जुन्या वस्तूंना नवा श्वास द्या, इतरांचा ज्ञानाचा प्रकाश वाढवा:
जुने पुस्तके जमा करून गरजु विद्यार्थ्यांना वाटप करणे लोकमान्य वाचनालयाचा अभिनव उपक्रम
जामखेड प्रतिनिधी
जुनी पुस्तके दान करणे म्हणजे
ज्ञानार्जनात गरिबीविरुद्धच्या कार्याला मदत करणे होय.आपण सर्वजण जाणतो की शिक्षण हे प्रत्येकाचा हक्क आहे. विद्यार्थ्यांचे हक्क आहे.
अनेक विद्यार्थी फक्त आर्थिक अडचणींमुळे नवीन पुस्तके, वह्या, इतर शालेय साहित्य तसेच खेळाचे साहित्य विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे इच्छा असुनही ते शाळेपासून व आवडीच्या खेळापासून दूर राहतात . अशा परिस्थितीत आपण “ज्ञानाचा दीप” म्हणजे त्या मूलांचा आधार आपण ठरू शकता.अशा प्रकारची संधी लोकमान्य वाचनालयाने आपणा सर्वांसाठी उपलब्ध केली आहे.असे लोकमान्य वाचनालयाच्या अध्यक्ष रमेशभाऊ गुगळे यांनी सांगितले.
यासाठी समाजातील सर्व घटकातील लोकांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे असलेले शालेय पुस्तके, शालेय साहित्य व खेळाचे साहित्य लोकमान्य वाचनालयाला आणुन द्यावे.
महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आणि इतर साहित्य रद्दीमध्ये, कवडीमोल दराने देण्यापेक्षा, ते लोकमान्य वाचनालयाला द्या.
तुमच्याकडून जमा झालेले हे शालेय साहित्य समाजातील विविध क्षेत्रातली गरजु गरिब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या आपल्या मदतीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते.
आपल्याकडे अडगळीत पडलेल्या
वस्तूंना नवा श्वास द्या, इतरांचा ज्ञानाचा प्रकाश वाढवा ज्ञानदान या पवित्र कार्यासाठी ग्रंथपाल – नंदू कोरडे 9689711372 या फोन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन रमेशभाऊ गुगळे यांनी केले आहे.


प्रतिनिधी यासीन शेख 9423391215