ताबा प्रकार ,वादग्रस्त बंद लिलाव ;आता आनंदाला वाव
मनोरंजन ,शक्ती ,भक्ती सांस्कृतिक ,पारंपरिकता म्हणजे नागपंचमी:
सर्वांना परवडेल, आवडेल असा आनंदमेळा -अमित चिंतामणी
डिजेशिवाय पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या – दशरथ चौधरी
जामखेड – यासीन शेख 9423391215
आराध्य दैवत श्री नागेश्वर यात्रा उत्सव म्हणजेच जामखेडची पंचमी होय.कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आराध्य देवतेचे स्मरण आणि पूजन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.महाराष्ट्र राज्यात सुप्रसिध्द असलेल्या पंचमी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्री नागेश्वर पालखी सोहळा दि १७ आँगस्ट रोजी होत असुन त्याच दिवशी मनोरंजन आनंदमेळयाची सुरुवात होत आहे . तसेच राज्यस्तरीय जंगी मैदानी कुस्त्यांचा भव्य हगामा दि १८ रोजी होत आहे .
या नागपंचमी यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यातुन मोठमोठे पाळणे, पशु पक्ष्यांचे खेळ, पन्नालाल-गाढवाची ओळख , सर्कस, मौत का कुआ, लहान मूलांचे खेळणी, आनंदमेळा अशा अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यापारी येतात.स्थानिक प्रशासनाकडुन अल्पदरात जागा उपलब्ध करून दिली जाते. या यात्रेमुळे स्थानिक बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होते.अनेक व्यावसायिकांचे वार्षिक अर्थिक व्यवहार या नागपंचमी यात्रेवर अवलंबून असतात.
मात्र संपूर्ण तालुक्याला आनंद देणारया या उत्सवाला गेल्या काही वर्षांपासून आयत्या बिळावर ……अशा लोकांची नजर लागली.त्यांना गुंड प्रवृत्तींच्या लोकांची साथ होती.
बाहेरगावाहून पोटाची खळगी भरण्यासाठी येणारांच्या पैशावर या विना कष्ट हेराफेरी करणारया लोकांची नजर गेली. स्थानिक स्वराज्य संस्था ठराविक रक्कम घेऊन पाळणे मनोरंजक खेळांना जागा उपलब्ध करून देत होते. त्यावर काही ८-१० लोकं टोळी करून पाळण्याचे व मनोरंजनाचे खेळ दमबाजी करत मनमानी पद्धतीने स्वतःच्या ताब्यात घेत होते. पंचमीत क्षुल्लक रक्कम देऊन तर दमबाजी करून सर्व आनंदमेळा ताब्यात घेणारे जामखेडमध्ये अनेक टोळ्या निर्माण झाल्या होत्या. यात जामखेडच्या पंचमीची जास्तच बदनामी झाली होती. नंतर गेल्या काही वर्षांपासून नव्या पध्दतीने म्हणजे लिलाव पद्धतीने हे लोकं आनंदमेळ्याची जागाच ताब्यात घेऊ लागले. व मनमानी पद्धतीने पाळणे मनोरंजन खेळ करणारांना भाड्याने देऊ लागले. सत्ताधारी राजकीय पदाधिकारयांचे कार्यकर्ते असल्याने पोलीस प्रशासनाकडुन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते . 
अनेकदा आनंदमेळयातील बाहेरगावच्या खेळ कामगारांना मारहाणीच्या घटनाही घडल्या.कोणीही दखल घेत नव्हते . कसलेही संरक्षण नाही त्यामुळे एक एक करता मोठे पाळणे, खेळ व्यापारी जामखेडला येणे बंद होत चालले होते. एकेकाळी नर्तकींचे डाव व आनंदमेळा पहाण्यासाठी राज्यभरातुन शौकीन लोक येत होते. म्हणजेच जामखेडच्या व्यावसायिकांच्या भरभराटीला हातभार लागत होता. मात्र केवळ आयजीच्या जीवावर बायजी असणारे गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांमुळे एकुणच पंचमी निमित्ताने होणारी जामखेडच्या छोट्या मोठ्या दूकानदारांची आर्थिक उलाढाल कमी होत चालली होती तर या टोळयांचे उखळ पांढरे होऊ लागले होते.
——————
वादग्रस्त बंद लिलाव ; आनंदाला वाव
——————-
यापुर्वी आनंदमेळा भरविण्याची जागा लिलाव पध्दतीने जात होती . स्पर्धेमुळे प्रतिवर्षी जागेचा लिलाव १०-१५ पटीने जास्त जात होता.त्यामुळे दूप्पट तिप्पट भावाने पाळणे व इतर खेळांना जागा भाडे द्यावे लागत आहे. . त्यामुळे पाळण्यांचे खेळांच्या वाढलेल्या भावामुळे नागरिकांची कुचंबना होती.आनंदनगरिचा आनंद सामान्य नागरिकांना मनसोक्त घेता येत नव्हता. एवढ्या मोठ्या यात्रेतही पाळणे, खेळणे वाले नूकसानीत राहत होते . या लिलावाच्या स्पर्धा,गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांकडून जबरदस्तीने पाळणे ताब्यात घेणे, फुकट जाणे, या गंभीर मुद्द्यांवर शांतता बैठकीत चर्चा होत नव्हती . नागपंचमी यात्रा उत्सवात प्रत्येक ठिकाणी गूंड प्रवृत्तीच्या टोळ्यांकडून शिरकाव होत होता. दहशत ,दमबाजी करत केवळ पैशा कमविणारया या आयजीच्या जीवावर बायजी लोकांवर प्रशासनाचा कसलाही अंकुश नव्हता . लोकप्रतिनिधीही जाणीवपूर्वक या लोकांकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे जामखेडची पंचमी उत्सव काही लोकांसाठी लूटमारीचे ठिकाण बनत आहे. दादागिरी आडमुठे करत वर्चस्व गाजवले जाते होते.प्रशासन बघून आंधळे ऐकून बहिरे होत होते.
—
# सुविधा ,माफक दर ,नगरपरिषद जवाबदारीच्या भुमिकेत#
—
यावर्षी आनंदमेळा उत्सव भरविण्याची जागा नगरपरिषदने ठरवली आहे मात्र काही लोकांनी या जागेसाठी विरोध केला. तसेच आणखी दूसरया ठिकाणीही आनंदमेळा भरवण्याची परवानगी मिळावी यासाठी दूसरायांदा शांतता कमिटीची बैठक घेण्यास प्रशासनाला भाग पाडले .मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुरक्षा व सुविधा पुरविण्यात सर्व यंत्रणांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून दूसरया ठिकाणाला परवानगी दिली नाही .यात्रेसाठी शहरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना ,नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी नगरपरिषदने स्वीकारली आहे .श्री नागेश्वराच्या पावनभुभीत जागेबाबत कसलाही लिलाव होणार नाही.आनंदमेळयात येणाऱ्या पाळणे खेळणे व इतर दुकानांना माफक दरात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे . सर्वसामान्य माणसाला परवडेल,महिला भगिनींसह सर्व नागरिकांना आनंदमेळयाचा आनंद घेता यावा यासाठी माफक दर ठेवण्याचे /देण्याचे नगरपरिषदने ठरवले आहे असे नगराध्यक्ष प्रतिनिधी अमित चिंतामणी यांनी सांगितले .म्हणतात ना “भगवान के घर देर है अंधेर नही ” छोट्या मोठ्या सर्व दूकानदारांची एकुणच जामखेडची आर्थिक उलाढाल होऊन बाजार पेठ फुलेल. पुन्हा पुर्वीसारखा मनोरंजन ,भक्ती,शक्ती सांस्कृतिक पारंपारिकतीने उत्सव सर्वांना आनंद देणारा जामखेडचा नागपंचमी यात्रा उत्सव पहायला मिळेल अशी आशा आहे .

#डिजेशिवाय पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्या – दशरथ चौधरी#
———-
पोलीस कारवाईचा इशारा
——————
आनंदमेळा व नागपंचमी यात्रा दरम्यान कोणीही गैरकृत्य केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिला आहे .आनंदमेळा यात्रेतल्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलिसांची यात्रेवर बारकाईने नजर राहील. नर्तिकांच्या डावाच्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे वॉच कँमेरे लावले जाणार आहेत .निर्देशित केलेल्या वेळेची मर्यादा सर्वांनी पाळा .विशेष म्हणजे नर्तकींच्या डावात डिजेशिवाय पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी डाव चालक मंडळांना केले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215