Homeव्हिडिओ बातम्याझिकी जवळ अपघात ; दूचाकीस्वराचा जागीच मृत्यू

झिकी जवळ अपघात ; दूचाकीस्वराचा जागीच मृत्यू

झिक्रि जवळ अपघात ; धडकेने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू

उन्हाचा पारा चढला ;वाहनं सावकाश चालवा

जामखेड प्रतिनिधी

सध्या उन्हाचा पारा चढला आहे. वाहनधारकांनी वाहने चालवतांना वेळेचे भान ठेवावे. नूकतेच जामखेड करमाळा रोडवरील झिक्री गावाजवळ झालेल्या स्विप्ट कार व मोटारसायकलच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

धडक इतकी जोराची झाली की मोटारसायकल चालकाचा जाग्यावरच मृत्यू झाला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवार दि ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मोटारसायकलस्वार हा जामखेड कडुन नान्नज कडे चालला होता. तो झीक्री येथील मंगल कार्यालया समोर आला असता तेथे स्विप्ट कारची धडक होऊन अपघात झाला.

या आपघातात मोटारसायकलस्वार रामा बाबुजी भिसे, वय ३९ रा. टाकळसिंग, ता. आष्टी जि.बीड याचा जागीच मृत्यू झाला. आपघात झाल्या नंतर स्विप्टचा कार चालक हा घटस्थळाहुन फरार झाला. ज्या लोकांनी त्या अपघातस्थळाची पहाणी केली ते सर्वजण मृतदेहाची अवस्था पाहुन हळहळ व भीती व्यक्त करत होते. जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

अपघातात मृत्यू झालेले रामा बाबू भिसे हे नान्नज येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करित होते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!