Homeव्हिडिओ बातम्याजामखेड शहरात १५ वर्षीय मूलीची आत्महत्या :राहत्या घरी गळफास घेऊन

जामखेड शहरात १५ वर्षीय मूलीची आत्महत्या :राहत्या घरी गळफास घेऊन

जामखेड शहरात १५ वर्षीय मुलीची आत्महत्या:

राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या भक्ती गणेश गायकवाड वय वर्षे १५ या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  राहत्या घरी ओढणीचे सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. मुलीने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत शहरात चर्चा असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर मयत तरूणीचे चुलते मोहन विनायक गायकवाड वय-३६ धंदा हॉटेल व्यवसाय रा वर्षे मोहा ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी आईवडीलासह मोहा येथे राहतो तर माझा मोठा भाऊ गणेश विनायक गायकवाड हा त्याचे कुटुंबासह शिवाजीनगर जामखेड ता जामखेड येथे राहणेस आहे.
दि.५ सप्टेंबर रोजी सायं ६ वा चे सुमारास मोहा ता येथे घरी असताना मला आमचे नातेवाईक तुकाराम भोरे यांनी फोन करुन सांगितले की तुझी पुतणी भक्ती गणेश गायकवाड हिने राहते घरी ओढणीचे सहाय्याने गळफास घेतला आहे . आम्ही तीला खाली उतरुन घेतले आहे व तीला उपचारकामी ग्रामिण रुग्णालय जामखेड येथे घेवुन जात आहोत तरी तु ताबडतोब ये असा फोन आल्याने मी ताबडतोब ग्रामिण रुग्णालय जामखेड येथे आलो त्यावेळी तेथील डॉक्टर यांनी पुतणी भक्ती गणेश गायकवाड हीस तपासुन ती मयत असल्याचे सांगितले. मयत मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. मयत मुलीच्या आईचे शहरातील बाजार तळावर ब्युटी पार्लरचे दुकान होते अशी माहिती कळली आहे.
. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!