जामखेड आगारातील सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ आधिवेशनासाठी नाशिकला रवाना
मुख्यमंत्री देवेंद्र फडविणस यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन
जामखेड प्रतिनिधी
एसटी कामगारांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी कायम लढत राहणारी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ आहे.
या संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दि २७ जूलै २०२५ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन कामागार मेळाव्याचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. नाशिक येथे कामगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जामखेड आगारातील सेवा शक्ती संघर्ष संघाचे सभासद जामखेड शाखेचे अध्यक्ष माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिककडे रवाना झाले आहेत.
यामध्ये
अध्यक्ष गणेश चिंचकर,जिल्हा अध्यक्ष प्रविण घायतडक, सचिव सावळाराम टकले,सहसचिव विठ्ठल जायभाय,
कार्याध्यक्ष नविन सोनार, माजी अध्यक्ष बापूसाहेब टकले, अनिल जायभाय, नारायण घुले, बाळू सानप, बाळू सारूक, बळीराम मेहेत्रे, राजेंद्र सासवडकर, संभाजी कुर्लेकर, योगेश कानडे, संदिप गिरी, नितीन काशिद आदी उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राहणार आहेत.
आ गोपीचंद पडळकर, आ तथा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष आ सदाभाऊ खोत, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ राहुल ढिकले, आ देवयानी फरांदे, आ सीमाताई हिरे सुनिल केदार सतिश मेटकरी अनुप खैरनार पद्मश्री राजे, शरद गिते राजाभाऊ पाठक, बाळकृष्ण आव्हाड, गौतम अहिरे, सुरेश सोनवणे, नंदाताई मथूरे, आनिताई बागड, अंजलीताई जोशी हे निमंत्रक आहेत तर व्यंकटेश आण्णा मोरे व प्रकाश कांबळे हे स्वागतोत्सुक आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
