जामखेडचा सामाजिक सलोखा कायम जपणार – अमित चिंतामणी
सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन शहरातचा विकास करणार
मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने नगरपरिषद पदाधिकारी व पत्रकारांचा सन्मान
जामखेड प्रतिनिधी
जामखेडचा सामाजिक सलोखा जपणार तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.सर्वाच्या सहकार्यने काम करत जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. तसेच शहराचे विद्रुपीकरण करणारे अतिक्रमणे समुमचाराने हटवून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देणार असे अमित चिंतामणी यांनी सांगितले.
मुस्लिम पंच कमिटी जामखेड यांच्या वतीने जामखेड नगरपरिषद नगराध्यक्ष व नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा व पत्रकारांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी अमित चिंतामणी, सर्व नगरसेवक तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
तसेच मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर काझी, उपाध्यक्ष सय्यद मंजुरअली, सेक्रेटरी आबेद खान कल्लीमुल्ला कुरेशी, शकिल शेख, खिजर खान, अय्यास शेख, शकिल शेख, सोहेल काझी, अय्यास शेख, समीर खान, शेरखान खान, मुख्तार सय्यद, इस्माईल सय्यद, परवेज खान, इमरान कुरेशी, नाजिम काझी, जावेद बागवान, जावीद सय्यद, नादीर शेख, इस्माईल शेख, नय्युम सुभेदार, फरमान शेख, अर्शद शेख, झाहीर शेख, आसिफ शेख, याकुब तांबोळी, जाफर सय्यद, इसहाक नालबंद, शाकीर काझी यांच्या सह या कार्यक्रमाला शहरातील विविध समाजातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अमित चिंतामणी बोलताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतचे अपुरे काम तात्काळ मार्गी लावण्यात येणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच उर्दू शाळेच्या परिसरातील भिंत व दर्याची भिंत याठिकाणी रस्त्याच्या कामासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहरभाई काझी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या विचाराने नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांनी काम करावे, दर्गा व उर्दू शाळा तसेच कब्रस्थान, इदगाह, दर्गा यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी अजहरभाई यांनी अपेक्षा व्यक्त केली..


तसेच शहराच्या सामाजिक ऐक्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी नगरसेवक व पत्रकार नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य करतील असेही अजहरभाईंनी सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215