Homeव्हिडिओ बातम्याजनतेच्या सेवेसाठी राजकारणात : संतोष गव्हाळे यांनी नगरसेवकपदासाठी निवडणुक लढवावी जनतेचा आग्रह

जनतेच्या सेवेसाठी राजकारणात : संतोष गव्हाळे यांनी नगरसेवकपदासाठी निवडणुक लढवावी जनतेचा आग्रह

जनतेच्या सेवेसाठी राजकारणात !

संतोष गव्हाळे यांनी नगरसेवकपदासाठी निवडणुक लढवावी जनतेचा आग्रह 

सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू संतोष भाऊ गव्हाळे वॉर्ड क्रमांक १२ मधून नगरसेवकपदासाठी इच्छुक:

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणूक जाहीर झाली. आपल्या लोकसेवेच्या व जनमानसातील संपर्काच्या जोरावर संतोष गव्हाळे प्रभाग क्रमांक १२ मधून नगरसेवकपदासाठी निवडणुक लढणार आहेत.
सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष भाऊ गव्हाळे यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १२ मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेद‌वारीची इच्छा व्यक्त केली आहे.
संतोष भाऊ गव्हाळे हे गेल्या अनेक वर्षापासून जामखेड तालुक्यात समाजातील गोरगरीब व गरजू लोकांसाठी काम करत आहेत. त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासन स्तरावर सामाजिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. समाजाच्या विकासासाठी झटत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आपल्या प्रश्नांसारख्या मानून त्यावर उपाययोजना करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळेच त्यांना जामखेडमधील नागरिकांचा आपला माणूस म्हणून खूपच विश्वास मिळत आहे.
संतोष भाऊ गव्हाळे नेहमीप्रमाणे आपला वाढदिवस सामाजिक जाणीव ठेवुन साजरा केला वाढदिवसानिमित्त भव्य पार्ट्या न करता समाजोपयोगी उपक्रम राबवतात. वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वही, पेन आणि नोटपॅड असे शालेय साहित्यांचे वाटप केले. याशिवाय त्यांनी आरोग्यदायी आणि प्रेरणादायी सामाजिक संदेश देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
दिवाळीच्या काळात गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना फराळाचे वाटप करून समाजात ऐक्य व सामाजिक सलोखा वाढविण्याचे काम केले. संतोष गव्हाळे यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे
नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळत असुन नागरिक व कार्यकर्त्यांकडून नगरपरिषद निवडणुक लढविण्यासाठी आग्रह होत आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!