छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा
जामखेड प्रतिनिधी
स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योध्दा होते. त्यांनी स्वराज्यसाठी लढलेल्या सर्व लढाया जिंकल्या होत्या. त्यांचा या अपराजित कामगिरीचा आदर्श घेऊन तरूणांनी आपल्या जीवनात परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे. तसेच मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे यांच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय शिक्षा भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने प्रा. विकी घायतडक यांच्या नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब देशपांडे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. अरूण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, नगर परिषदेचे माजी सभापती मोहन पवार, मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, गुलाब जांभळे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शहाजी डोके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, मौलाना खलील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, माजी नगरसेवक पवन राळेभात, अमित जाधव, प्रवीण उगले, विकास मासाळ, भिम टोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, संतोष गव्हाळे, राहुल अहिरे, अशोक आव्हाड, विशाल अब्दुले, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नामदेव राळेभात, रूपेश निकाळजे, हभप नन्नवरे महाराज, हरिभाऊ आजबे, अमोल गिरमे, नरेंद्र जाधव, बिभीषण धनवडे, इस्माईल सय्यद, मुक्तार सय्यद, ॲड. हर्षल डोके, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार,
समीर पठाण सह सुनिताताई मधुकर राळेभात, बौद्ध महासभेच्या सुरेखा सदाफुले, जया जाधव, आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.जिथे पिकते तिथे विकत नाही. आपल्या जवळच अनेक गुणवंत व्यक्ती असतात पण आपण त्यांची किंमत करत नाही. पुरस्कार मिळणे कठीण काम असते. कर्तव्यशी जोडलेली जी माणसे असतात त्यांचा इतर ठिकाणी सन्मान होत असेल तर आपणही त्यांचा सत्कार करणे महत्त्वाचे वाटते म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या जामखेड शहरातील मोठे साहित्यिक वात्रटिकाकार रामदासजी फुटाणे व ज्यांच्या साहित्यावर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात अभ्यास व अनेक जण पी. एच. डी. करत आहेत असे प्रा. आ. य. पवार अश्या मोठ्या व्यक्ती आहेत. मात्र जामखेडकरांकडून अश्या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान होत ना दिसत नाही याची खंत वाटते. त्यामुळे पदाधिकारी व नागरिकांनी आपले कर्तव्य समजून अशा सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व कार्यक्रमाचे आयोजक प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.जामखेड शहरातील मोरे वस्ती येथील एन. आर. ज्वेलर्स समोर आज दि. १६ जानेवारी रोजी प्रा. मधुकर राळेभात मित्र परिवाराच्या वतीने जामखेड पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक यांना शिक्षा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जामखेड येथे नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब देशपांडे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. अरूण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, नगर परिषदेचे माजी सभापती मोहन पवार, मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, गुलाब जांभळे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शहाजी डोके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, मौलाना खलील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, माजी नगरसेवक पवन राळेभात, अमित जाधव, प्रवीण उगले, विकास मासाळ, भिम टोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, संतोष गव्हाळे, राहुल अहिरे, अशोक आव्हाड, विशाल अब्दुले, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नामदेव राळेभात, हभप. नन्नवरे महाराज, हरिभाऊ आजबे, अमोल गिरमे, नरेंद्र जाधव, बिभीषण धनवडे, इस्माईल सय्यद, मुक्तार सय्यद, ॲड. हर्षल डोके, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, समीर पठाण सह सुनिताताई मधुकर राळेभात, बौद्ध महासभेच्या सुरेखा सदाफुले, जया जाधव, आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
राज्यस्तरीय शिक्षा भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. विकी घायतडक यांच्या नागरी सत्काराबरोबरच भानुदास बोराटे (शिक्षणरत्न पुरस्कार) व गायत्री भुषण राळेभात (पोलीस उपनिरीक्षकपदी निवड) यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात राज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज रक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय वारे, ॲड. अरूण जाधव, शहाजी राळेभात, डॉ. भगवान मुरुमकर, पो. नि. महेश पाटील, प्रा. नरके, मौलाना खलील, शहाजी डोके, यांनी आपल्या मनोगतून शुभेच्छा दिल्या.
तर सत्कारमूर्ती प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक, भानुदास बोराटे व गायत्री राळेभात यांनी सत्कार केल्याबद्दल अभार व्यक्त करत मिळालेल्या यशासाठी केलेले काम व अभ्यास याबद्दल सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मधुकर राळेभात, सुत्रसंचलन डॉ. कैलास हजारे, आभार अमित जाधव यांनी मानले.जामखेड येथील डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी काॅलेजचे प्राचार्य प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक यांना गोवा, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू या पाच राज्यातून दिला जाणाऱ्या ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे आयोजित शैक्षणिक क्षेत्रात इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षा भुषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.




