चौडी या ऐतिहासिक ठिकाणी बैठक; आता ऐतिहासिक निर्णय जामखेडसाठी होईल??
सभापती प्रा राम पाणी, रोजगार शिक्षण याबाबत सभापती प्रा राम शिंदे यांच्याकडून अपेक्षा
जामखेड प्रतिनिधी
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौडी येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीकडे जामखेडकरांचे विशेष लक्ष लागले आहे.
जामखेडला काय देणार. जामखेड कर्जत मतदारसंघाच्या निवडणुका कुकडीचे पाणी आणि एमआयडीसी याच मूद्यावर अनेक वेळा लढल्या गेल्या. तसेच जामखेड शहराला मंजूर झालेले दहिगाव- उजणी पाणी योजनेसाठी करोडोंचा नीधी आला मात्र अद्यापही पाणी कुठे दिसत नाही.
दि ६ मे रोजी चोंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रामुख्याने पाणी, रोजगार प्रश्नावर चर्चा होणारच मात्र नेहमीप्रमाणे चर्चा आणि नीधीचा आकडा जाहीर होणार की प्रत्येक्षात देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जामखेडचे सुपुत्र विधानसभापरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या विशेष पुढाकारातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.
प्रा राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असल्याचे राज्याला माहिती आहे. आज प्रा. राम शिंदे यांना सर्वोच्च पदावर म्हणजे विधान परिषदेचे सभापतीपदी पदावर आहेत. त्यामुळे पुन्हा जामखेड तालुक्यातील तरूण, नागरिक, मजूर, शेतकरी यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सभापती झाल्यावर चौंडी या ऐतिहासिक ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. चौडी – पाणी रोजगार शिक्षण या बाबत काही तरी ऐतिहासिक सकारात्मक निर्णय होईल. याबाबत सभापती प्रा राम शिंदे यांची भुमिका व मंत्रिमंडळ बैठकीत होणारे निर्णय याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
