चुकीचा रिपोर्ट का दिला म्हणत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ, हुज्जत करत धमकी एक जणांविरोधात तक्रार दाखल ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात खरच लक्षपूर्वक, गांभीर्याने आरोग्य सेवा देतात का?? हेही तपासावं.
चुकीचा रिपोर्ट का दिला म्हणत
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ, हुज्जत करत धमकी
एक जणांविरोधात तक्रार दाखल
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात खरच लक्षपूर्वक, गांभीर्याने आरोग्य सेवा देतात का?? हेही तपासावं.
जामखेड प्रतिनिधी
चुकीचा रिपोर्ट का दिला अशी विचारणा करत नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत अर्वाच्य शिवीगाळ व दमदाटी धमकी दिल्याची घटना घडली आहे .याबाबत कृष्णा प्रकाशसिंग राजपूत रा. नान्नज यांच्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे .
याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी स्मिता सुरेश भोरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी अश्विनी परसराम झगडे, लक्ष्मण रंगनाथ ठोसर, अविनाश अर्जुन तोरडमल आणि हसीना बिन्ते शब्बीर शेख आदी कामावर उपस्थित होते.
यावेळी कृष्णा प्रकाशसिंग राजपूत हे तेथे आले. रुग्णांच्या उपचारासंदर्भात झालेल्या वादातून त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत मोठमोठ्याने शिवीगाळ केली .दवाखान्यात इतर रुग्ण उपचारासाठी उपस्थित असल्याने शांतता राखण्यास सांगितल्यानंतरही संबंधित व्यक्तीने आक्रमक भूमिका घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच संबंधित व्यक्तीने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची तसेच दवाखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.तसेच संबंधित व्यक्तीने चुकीचा रिपोर्ट का दिला, असा जाब विचारत पुन्हा शिवीगाळ केली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी वैद्यकीय अधिकारी स्मिता सुरेश भोरे यांनी कृष्णा प्रकाशसिंग राजपूत यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
—-चौकट—
प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्यसेवेची निराशा
———–
अशा घटना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करतात .संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी मात्र तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेबाबत खुप तक्रारी आहेत .ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात खरच वैद्यकीय सेवा दिली जाते का ? सदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मनापासून ड्यूटी करतात का? रुग्णांच्या समस्येबाबत गांभीर्याने विचार करतात का ? आमच्याकडे हे नाही, ते नाही असे सांगत रूग्णांना सरळ रेफर केले जाते .पुढे जाण्यास सांगितले जाते .मग या प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे तरी काय ? रूग्णाकडे लक्ष देत फार वेळ बसावं लागतं म्हणून देखील साधं सलाईन देखील लावले जात नाही अशाही तक्रारी आहेत .कामात अक्षम्य दुर्लक्ष, हलगर्जीपणा होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत .या गंभीर बाबींचीही दखल घ्यावी .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!