गळ्यातुन सोन्याची चैन हिसकावली ÷ मोटारसायकलवरून चोरटे फरार
चोऱ्यांचे सत्र सुरूच
जामखेडमध्ये रात्रीच धक्कादायक स्नॅचिंग!
१.५ लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या चोऱ्यांचे सत्र चालूच आहे. दि १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने जामखेड शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे
. मिलींदनगर, जामखेड येथील रंजना राम काळे (वय ५५ वर्षे, घरकाम, रा. मिलींदनगर, या महिलेच्या गळ्यातील ५० ग्रॅम (प्रति ग्रॅ. ₹३०००, एकूण ₹१,५०,०००) किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरटय़ांनी मोटारसायकलवर येऊन गळ्यातुन ओढून घेत पसार झाले.
शहरातील नागेश शाळेसमोरून घरी जात असताना रात्री ९.१० वाजता ही घटना घडली आहे.
तक्रारीनुसार गुन्हा रात्री ११.४१ वाजता जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.क्र.: २०१/२०२६ कलम बीएनएस २०२३ कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रंजना काळे नागेश शाळेसमोरून मिलींदनगर येथील त्यांच्या घरी चालत जात होत्या. अचानक अज्ञात मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जोरात ओढली आणि वेगाने फरार झाले. या घटनेमुळे रंजना यांना धक्का बसला असला तरी सौभाग्याने शारीरिक इजा झाली नाही.
त्या घाबरून घरी पोहोचल्या आणि तात्काळ जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.महिला मुलींना रस्त्याने चालणे फीरने भीतीदायक झाले आहे. पोलिसांनी अशा भुरट्या चोरांच्या मुसक्या बांधण्याची गरज आहे.
या घटनेमुळे मिलींदनगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. विशेषतः महिलांना रात्री एकटे फिरू नये आणि मौल्यवान दागिने कमी करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जामखेड शहरात अलीकडे चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क वाढवण्याची आणि नाइट पेट्रोलिंग तीव्र करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
या प्रकरणाचा तत्काळ तपास करून आरोपींना लवकर अटक करण्याची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!