जामखेड प्रतिनिधी
ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण सुरक्षित आबाधित राहावे यासाठी दि. 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे होत असलेल्या एल्गार सभेसाठी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते माजी नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये. यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने मुंबईत येथे भव्य एल्गार मोर्चाचे नियोजन करण्यात येत आहे . त्यापूर्वी अहमदनगर येथे दि. 3 फेब्रुवारी रोजी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ ,माजी मंत्री आ प्रा राम शिंदे आ. गोपीचंद पडळकर ,पद्मभूषण लक्ष्मण गायकवाड, ओबीसी नेते टीपी मूंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ओबीसी समाजाच्या नेते ठिकठिकाणी बैठका घेऊन जनजागृती करत अहमदनगर येथील सभेचे नियोजन करत आहेत. ओबीसी समाज आपल्या न्यायहक्कासाठी नेहमीच पुढे आलेला आहे. यावेळी आपल्या हक्कासाठी ओबीसी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी अहमदनगर येथे होत असलेल्या एल्गार सभेसाठी जामखेड तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन ओबीसी नेते व जामखेड नगरपरिषदेचे माजी सभापती मोहन पवार यांनी केले आहे.