Homeव्हिडिओ बातम्याएमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन अखेर स्थगित आमदार रोहित पवारांच्या...

एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन अखेर स्थगित आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नाला यश ;अध्यक्षांची रजेवर पाठवणी: चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांच्यासह ५ सदस्यांची समिती

एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन अखेर स्थगित

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नाला यश ;अध्यक्षांची रजेवर पाठवणी:

चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांच्यासह ५ सदस्यांची समिती:

सिटीझन प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यासाठी पुण्यातील एस एम जोशी पूल येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी दि.११ रोजी भेट देत विद्यार्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे अकराव्या दिवशी सुरू असेलेले अखेर एमपीएससी विद्यार्थांचे आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
एम पी एस सी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचे समाजमाध्यमातील पोस्ट (ट्विटर) द्वारे जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे या समितीत एफडीए चे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकाची मागणी मान्य केली असून स्थापन केलेल्या समितीत तुकाराम मुंढे हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.असे आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितले.

सरकारने एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास मान्यता दिली आहे.आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेणार आहे . आगामी गट ‘क’ (Group-C) पदभरतीमध्ये दुपटीने वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की,११ दिवस चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शासनाने एकूण १५ मागण्या मान्य केल्या आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही सोबत राहु, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान महारष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी चौकशी होऊ पर्यंत पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!