जामखेड प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमातून कर्जत तालुक्यातील राक्षस वाडी येथे युवतीवर धारधार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केला. नंतर या नराधमाने स्वतःवरही चाकूने हल्ला करून घेण्याची घटना ट घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे .
मयत श्रावणी पाटोळे ही करमाळा तालुक्यातील मसेवाडी येथील राहणार असून इयत्ता १२ वी कर्जत येथे मामाकडे शिकायला होती . इयत्ता बारावीची सराव परीक्षा सुरू आहे. श्रावणी ही राक्षस वाडी बुद्रुक येथे आपल्या मामाच्या गावी शिक्षण घेण्यासाठी रहात होती. मुलीवर प्रतीक लक्ष्मण काळे वय २२ वर्षे राहणार राक्षस वाडी बुद्रुक तालुका कर्जत येथील प्रियकर एकतर्फी प्रेम करत होता.ती कर्जत येथे एका कॉलेज मध्ये शिकत होती. तिने कॉलेज मध्ये बारावीचा पेपर दिला यानंतर तिच्या राक्षस वाडी बुद्रुक येथील मैत्रिणीच्या समवेत ती तिच्या गाडीवर बसून राक्षस वाढीला आली. राक्षस वाडी येथे श्रावणीचे आजी आजोबा व मामा राहतात.
श्रावणीच्या आईचे गाव राक्षस वाडी आहे.श्रावणीला घरी सोडल्या नंतर श्रावणीने मैत्रिणीला चहा करून पाजला त्यानंतर मैत्रीण निघून गेल्यावर त्या ठिकाणी नराधम प्रतीक काळे याने तिला अडवले व मी तुझ्यावर प्रेम करतो परंतु तू का मला प्रतिसाद देत नाही असे विचारणा केली असता श्रावणी हिने मला खूप शिकून मोठे व्हायचे आहे असले प्रेम वगैरे काही करावयाचे नाही आणि विनाकारण मला त्रास देऊ नको अन्यथा मी मामाला तुझे नाव सांगेल असे म्हणताच प्रतीकला राग आला व त्याने सोबत आणलेला धारदार चाकू श्रावणीच्या पोटामध्ये वार केला.
हा वार एवढा जोरात होता की तो चाकू श्रावणीच्या पोटातून आरपार गेला आणि ती तिथेच खाली कोसळली. यावेळी झटापटी देखील झाली श्रावणी जोरजरात ओरडली शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्यानंतर आसपासचे लोक धावत आले. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावणीला पाहिले. यानंतर प्रतीक काळे यांनी त्याच चाकूने स्वतःच्या पोटावरही वार करून घेतले. दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणी चा मृत्यू झाला होता. जखमी झालेल्या प्रतिकाऱ्यास नगर येथे उपचारासाठी देण्यात आले आहे.
.
यासीन शेख 9423391215