Homeव्हिडिओ बातम्याइंग्रज परत आले की काय ??दिल्लीतील परस्थिती पाहीली की वाटतं! शिक्षण...

इंग्रज परत आले की काय ??दिल्लीतील परस्थिती पाहीली की वाटतं! शिक्षण सर्वांसाठी, विद्यार्थी मूलं सर्वांची , ना जातीची, ना धर्माची, ना पक्षाची ही लढाई सर्वाची दिल्ली जंतर मंतर वर आंदोलकांवर अमानुष हल्ला जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने निषेध

 इंग्रज परत आले की काय ??दिल्लीतील परस्थिती पाहीली की वाटतं!

शिक्षण सर्वांसाठी, विद्यार्थी मूलं सर्वांची , ना जातीची, ना धर्माची, ना पक्षाची ही लढाई सर्वाची

दिल्ली जंतर मंतर वर आंदोलकांवर अमानुष हल्ला

जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने निषेध

जामखेड प्रतिनिधी

आपण सर्वजण स्वतंत्र भारतात राहत आहोत .लोकशाहीच्या आधारे सर्वांना आपले म्हणणे मांडणे व मागण्या करण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे .दिल्ली येथे विद्यार्थ्यी आपल्या हक्कासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते.

मात्र दिल्ली पोलीस व त्यांच्या यंत्रणेकडून त्या विद्यार्थ्यां आंदोलकांवर अमानुषपणे लाठी हल्ला करत जबर मारहाण करण्यात आली .यामध्ये हजारो विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत .त्या ठिकाणी पोलिसांकडून आपल्याच विद्यार्थी आंदोलकांवर होत असलेल्या अमानुष, माणुसकी शुन्य कारवाई पाहता भारतात इंग्रज परत आले काय ?? असा प्रश्न पडतो .इतके निर्दयपणे पोलिसांनी वागू नये . शिक्षण सर्वांसाठी ,विद्यार्थी मूलं सर्वांची ,ना जातीची ,ना धर्माची ,ना पक्षाची ही लढाई सर्वाची अशा संतप्त भावना जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टरांनी निषेध करतांना व्यक्त केल्या .

दिल्ली येथे जंतर मंतर वर लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर व सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवर दिल्ली पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला .यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलक व विद्यार्थी डॉक्टर जखमी झाले आहेत .

पोलिसांच्या या अमानुष कृत्याचा जामखेड तालुका डॉक्टर असोशिएशनच्या निषेध करण्यात आला आहे .याबाबत तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे .यावेळी जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत गायकवाड, संस्थापक सचिव डॉ सादेख पठाण, उपाध्यक्ष देवकर मॅडम , डॉ मेघराज चकोर ,डॉ सुशिल पन्हाळकर , डॉ विकी दळवी,डॉ बाळासाहेब मुळीक ,डॉ फारुक शेख , डॉ.भरत देवकर, डॉ. निखील वारे, डॉ. अक्षय अडाळे, डॉ. सचिन अडाळे, लॅब असोसिएशनचे अध्यक्ष संजय कोल्हे, महेश यादव व मोहसीन सय्यद इत्यादी डॉक्टर व लॅब टेक्निशियन उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!