Homeव्हिडिओ बातम्याआ. संग्राम जगतापांच्या वक्तव्याचा खर्डा येथे निषेध मुस्लिम समाजाबद्दल...

आ. संग्राम जगतापांच्या वक्तव्याचा खर्डा येथे निषेध मुस्लिम समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरला : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: आमदारकी रद्द करून कारवाईची मागणी

आ. संग्राम जगतापांच्या वक्तव्याचा खर्डा येथे निषेध

 

 

मुस्लिम समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरला :

दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न:

 

आमदारकी रद्द करून कारवाईची मागणी

 

 

जामखेड प्रतिनिधी –

राज्यात काही दिवसांपासून काही राजकीय नेत्यांचा वाचाळपणा. समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. सरकार पक्षातर्फे कोणतीही तंबी कींवा कारवाई होतांना दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरचे आ. संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी भर सभेत मुस्लिम समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून आ संग्राम जगताप असे कृत्य जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम विकास परिषद सामाजिक संघटना तसेच समस्त मुस्लिम समाज बांधव खर्डा शहर यांच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.

जामखेड तालुक्यातील खर्डा शहर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दि ७ जूलै रोजी खर्डा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.यावेळी मुस्लिम समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी कॉंगेस (शरद पवार) गट जामखेड तालुका,वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका,स्वाभिमानी शेतकरी संघटना अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर पाटील,ग्रा.पं.सदस्य मदन गोलेकर पाटील,ग्रा.पं.सदस्य वैभव जमकावळे,मुस्लिम विकास परिषदेचे राज्य प्रवक्ते रिजवान बागवान,रौफ शेख,गफ्फार कुरैशी,आलताफ कुरैशी,युसुफ बागवान,अजमेर पठाण,शकील मोमीन,जमील सिकलकर,फिरोज मापाडी,कलिम शेख,इलियास कुरैशी,शाहिद मोमीन,फारूख आतार,आदि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!