जामखेड प्रतिनिधी
भाजपा नेते, माजीमंत्री आ. प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड कर्जत तालूक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . भाजपा युवा मोर्चाचे तालूका उपाध्यक्ष मोहन मामा गडदे नेहमी सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतात .आ प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन मामा गडदे यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले .जामखेड शहरालगत असलेल्या चुंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मूलां मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .यावेळी शाळेतील मूलांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह पाहण्यासारखा होता. यावेळी भाजपा यूवा मोर्चाचे तालूका उपाध्यक्ष मोहन (मामा),कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र शिवराम हुलगुंडे, चुभळी जिप शाळेचे एच एम राऊत सर,व मॅडम तसेच आजबे वस्तीवरील जि प शाळेतील सौ.हुलगुंडे मॅडम पालक व विद्यार्थी उपस्थित होते .