आ रोहित पवार नाराज?
सत्तेत सहभागी होणार?
राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण
जामखेड प्रतिनिधी
जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे स्वपक्षातील घडामोडींवर नाराज असून लवकरच सत्तेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. सुनिल शेळके यांनी केला. मात्र, त्यांना आमच्या पक्षात घ्यायचे की नाही, याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सुनिल शेळकेंच्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना सूनिल शेळके म्हणाले की
रोहित पवारांना त्यांच्या मतदारसंघात निसटा विजय मिळाल्याचे पाहायळा मिळाले. मतदारसंघातील लोक त्यांच्या कामावर समाधानी नाहीत, असे चित्र आहे. त्यांच्या पक्षात देखील एकमेंकाच्या कुरघोड्या करत बसणे किंवा एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना स्थान, योग्य सन्मान दिला पाहिजे, पण ते होत नाहीये. त्यामुळे काही नेते मंडळी नाराज आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे रोहित पवार कधी सत्तेत सामील होतील, हे सांगू शकत नाही. त्यांची सत्तेकडे जास्त ओढ आहे. हिंदुत्ववाकडे ओढ आहे, हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे.
रोहित पवारांना आमच्या पक्षात त्यांना घ्यायो की नाही याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, तसेच जयंत पाटील देखील लवकरच सत्तेत सहभागी झालेले पाहायला मिळतील, त्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्याचेही आमदार शेळके यांनी म्हटले.
रोहित पवारांनी व्यक्त केलेली नाराजी वस्तुस्थिती आहे. त्यांचा परफॉर्मन्स मतदारसंघात आणि पक्षात योग्य दिसत नाही. त्यामुळे त्यांना पक्षात डावलले जात आहे. रोहित पवारांना पक्षापेक्षा, त्यांच्या निष्ठेपेक्षा सत्तेची भूक लागलेली आहे. त्यांना सत्तेकडे येण्याचे प्रेम सुटलेले आहे. त्यामुळे ते सत्तेकडे येण्याच्या मार्गावर आहेत. ते कधीही सत्तेत सामील होऊ शकतात, असा दावाही सुनिल शेळके यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. दरम्यान, सुनिल शेळके यांनी केलेल्या दाव्यावर शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.
पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, गेली ७ वर्षे पक्षासाठी लढल्यानंतर कुठेतरी आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत असल्याने कदाचित त्यांनी निर्णय घेतला असेल. एक आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय किंवा नसला काय सामान्य लोकांच्या हितासाठी आजपर्यंत मी लढत आलो आहे. पक्षाचा पाठिंबा कायम राहिला असून विशेषतः शरद पवारांचा पाठिंबा माझ्यासारख्याला आणि इतरही कार्यकर्त्याला राहिलेला आहे. तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे कुठली जबाबदारी आलेली नाही किंवा जबाबदारी दिल्याचे कळाले नाही. जबाबदारी दिली नाही म्हणून नाराज आहे असा विषय नाही. खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आले आहेत. लढले पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले.
मी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते, मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत. परंतु आज लोकांच्या बाजूने बोलताना खूप कमी नेते दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असे बोलायला हरकत नाही मी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते, मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत. परंतु आज लोकांच्या बाजूने बोलताना खूप कमी नेते दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असे बोलायला हरकत नाही. त्यामूळे मतदारसंघासह राज्याचे
आमदार रोहित पवार यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांच्या भावना अद्याप समजल्या नाहीत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215