जामखेड शहरातून मिरवणूक
जामखेड प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय
मलेशिया येथून आंतरराष्ट्रीय उच्च प्रशिक्षण घेऊन जामखेड येथे परत आल्यावर जामखेड येथील पोलीस उपनिरीक्षक सौ.गायत्री राळेभात यांची खर्डा चौकापासून तपनेश्वर येथील घरापर्यंत जामखेड शहरातून मिरवणूक काढण्यात आली .ठिकठिकाणी मान्यवर व नागरिकांकडून अभिनंदन व स्वागत करण्यात आले .
महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापणाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आचार्य पदवीच्या (Ph.D) विद्यार्थिनी सौ. गायत्री चव्हाण तथा सौ गायत्री भूषण राळेभात यांची एक महिन्याच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी मलेशिया देशामधील पुत्रा विद्यापीठात निवड झाली होती .
सौ.गायत्री या सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथे कृषी विस्तार विषयामध्ये आचार्य पदवीचे (Ph.D) शिक्षण घेत आहेत. तसेच सौ. गायत्री यांनी बऱ्याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग नोंदवला आहे.
तरी सौ.गायत्री चव्हाण (राळेभात) या जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव राळेभात यांच्या सुन आहेत.पोलिस उपनिरीक्षक गायत्री राळेभात यांचेवर संपूर्ण विद्यापीठातून व जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संतोष पवार, जेष्ठ नेते भानुदास बोराटे, भिम टोला संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, पोपट गायकवाड, गुलाब जांभळे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे अध्यक्ष व शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे (सेवानिवृत्त), नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रसिद्ध उद्योगपती विजय कोठारी, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, युवा नेते दादासाहेब (हवा) सरनोबत, माजी सरपंच बापूसाहेब कारले , सनी सदाफुले, प्रसिद्ध व्यापारी हाजी जावेद बागवान, वाजेद बागवान, बीलाल शेख, साजीद बागवान ,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, आष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुंदर देशमुख, सचिन देशमुख, शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे, पंडित ज्वेलर्स, भाजपा प्रसिद्धी प्रमुख उध्दव हुलगुंडे आदी मान्यवर व पक्षसंघटना व मान्यवरांकडून पोलीस उपनिरीक्षक गायत्री व पती भुषण राळेभात यांचा आदींनी सत्कार केला.
———————————–
मुलींना आई-वडीलांप्रमाणेच सासु-सासऱ्यांचे प्रोत्साहन असेल तर मुलीच काय पण सुनाही यशाचे मोठे शिखर गाठू शकतात. MPSC म्हणजे आयुष्यातील झुगार आहे. आपल्या आई वडीलांचे कष्ट व खर्च केलेला पैसा सार्थकी लावायचा असेल, त्यांच्या कष्टाचे चीज करायचे असेल तर तुम्हाला यश मिळवावेच लागेल. या यशासाठी माझ्या आईवडीलांईतकेच सासु-सासऱ्यांकडून प्रोत्साहन मिळाले. असे सासर प्रत्येक मुलीला मिळावे असे नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक गायत्री भुषण राळेभात यांनी भावना व्यक्त करताना सांगितले